Shah Rukh Khan | ‘चंद्रयान 3’च्या लँडिंगनंतर शाहरुख खानने म्हटले हे गाणे, प्रकाश राजने दिल्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा

| Updated on: Aug 23, 2023 | 10:58 PM

चंद्रयान 3 च्या लँडिंगनंतर संपूर्ण देश आनंदात बघायला मिळत आहे. संपूर्ण देशवासियांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा नक्कीच आहे. जगभरातून भारताच्या वैज्ञानिकांचे काैतुक केले जात आहे. चंद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे.

Shah Rukh Khan | चंद्रयान 3च्या लँडिंगनंतर शाहरुख खानने म्हटले हे गाणे, प्रकाश राजने दिल्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा
Follow us on

मुंबई : चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर (Chandrayaan 3 Landing) संपूर्ण देश आनंदामध्ये आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त अभिमानाची आणि काैतुकाची भावना बघायला मिळत आहे. परत एकदा भारताने (India) जगाला दाखवून दिले की, आम्ही कुठेच कमी नाहीत. आज सकाळापासूनच सर्व देशाचे लक्ष चंद्रयान 3 च्या प्रत्येक अपडेटकडे होते. जगभरातून भारताला चंद्रयान 3 साठी शुभेच्छा मिळत होत्या. शेवटी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असलेला क्षण आला आणि चंद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाले. संपूर्ण देश जल्लोष करताना दिसत आहे.

बाॅलिवूडच्या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला आनंद जाहीर केला आहे. अनिल कपूर यांनी खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचेच अभिनंदन केले आहे. कार्तिक आर्यन यानेही पोस्ट शेअर केलीये. संपूर्ण बाॅलिवूडचे कलाकार आपआपल्या भावना सतत व्यक्त करताना दिसत आहेत.

आता नुकताच बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान यानेही एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत करत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करताना शाहरुख खान याने एक गाणे देखील म्हटले आहे. आता शाहरुख खान याची हिच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

शाहरुख खान याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘चांद तारे तोड लाऊं….सारी दुनिया पर मैं छाऊ…आज भारत आणि इस्रो छाऊ गये… सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन…ज्यांनी भारताचा गौरव केला आहे. चंद्रयान 3 यशस्वी झाले… चंद्रावर सॉफ्ट लँडिंग…

आता चाहते हे शाहरुख खान याच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. शाहरुख खान यासोबतच शाहरुख खान याने एक खास फोटो देखील शेअर केला आहे. शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. अगोदर चंद्रयान 3 चा मजाक उडवताना प्रकाश राज हे दिसले होते. प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि लोकांसाठी एक अभिमानाचा क्षण… #ISRO #Chandrayaan3 #Vikramlander ज्यांनी हे घडवून आणण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार… आता प्रकाश राज यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.