मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा ‘बेशर्म रंग’ गाण्यामुळे तुफान चर्चेत आला. ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिका हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक धार्मिक कार्यकर्ते आणि राजकीय आक्षेपामुळे ‘पठाण’ सिनेमा चर्चेत आला. अद्यापही दीपिकाच्या भगव्या बिकीनीमुळे वातावरण तापलेलं असताना आणखी एका अभिनेत्रीने भगव्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस घातला आहे.
दीपिकानंतर भगव्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस घालणाऱ्या अभिनेत्रीचं नाव अपर्णा शेट्टी आहे. अर्पणा शेट्टी हिचा ‘मसालेदार तेरा प्यार’ हे गाणं नुकताच प्रदर्शित झालं. गाण्यामध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य देखील आहे. गाण्यात अपर्णा अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
‘मसालेदार तेरा प्यार’ गाण्यात अनेक ठिकाणी अपर्णा अनेक ठिकाणी भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ज्यामुळे अनेकांनी गाण्यावर आणि आर्पणाने घातलेल्या भगव्या रंगाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे. गाण्यात जाणूनबुजून भगव्या रंगाचा वापर करण्यात आल्याचं सध्या बोललं जात आहे. देशाच्या सनातन संस्कृतीवरचा हल्ला असल्याचं सांगत गाणं बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेश आचार्य आणि अपर्णा शेट्टी ‘मसालेदार तेरा प्यार’ हे रोमांटिक गाणं आहे. गाण्यात अपर्णाने घातलेला भगव्या रंगाचा ड्रेस वादाचं कारण ठरत आहे. दीपिका पादुकोण हिने देखील ‘पठाण’ सिनेमात भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. ज्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आडकला. आता सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे काही धर्मिक कार्यकर्त्यांनी संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आरोप केले. दरम्यान, भगव्या रंगामुळे दीपिकानंतर अपर्णा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिला सोशल मीडियावर देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र भगव्या रंगाच्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे अपर्णा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
‘मसालेदार तेरा प्यार’ RGF Music च्या अधिकृत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये गणेश आचार्य आणि अपर्णा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघांचा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण काही लोकांनी भगव्या रंगाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे. गाण्याचे लिरिक्स प्रणव वत्स आणि म्यूजिक माधव राजपूत यांनी दिलं आहे. सध्या गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.