चाळीशी पार करताच अनेकांची वागणूक…, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दुसऱ्या पत्नीकडून खंत व्यक्त

| Updated on: Apr 26, 2024 | 1:58 PM

Bollywood Actress Life | झगमगत्या विश्वात कसं असतं अभिनेत्रींचं आयुष्य? खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अभिनेत्रींना करावा लागतो अनेक गोष्टींचा सामना... आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दुसऱ्या पत्नीने केलाय मोठा खुलासा... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

चाळीशी पार करताच अनेकांची वागणूक..., प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दुसऱ्या पत्नीकडून खंत व्यक्त
Follow us on

झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये काम करत असताना खासगी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देताना अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लगतो. असंच काही झालं आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दुसऱ्या पत्नीसोबत. सध्या ज्या दिग्दर्शकाच्या दुसऱ्या पत्नीची चर्चा रंगली आहे, ती स्वतःएक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण आता अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं आहे. वयाच्या 40 व्या वर्षात पोहोचल्यानंतर अभिनेत्री पूर्वीप्रमाणे सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री कल्की केक्ला आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

कल्की म्हणाली, ‘आजकाल लोक खूप कठोर मनाचे झाले आहेत. विशेषतः जेव्हा ते चाळीशीमध्ये पोहोचतात… त्या व्यक्तींना बिलकूल माहिती नसतं की त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे. त्यांना मोनोपॉजबद्दल काहीही माहिती नसतं. आपण यावर जास्त बोलत नाही लिहित नाही… हे देखील यामागचं मुख्य कारण आहे..’

‘मी पूर्वी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करायची पण आता मी फार ठराविक सिनेमांमध्ये काम करते. कारण मला माझ्या मुलीपासून लांब राहायचं नाही. आज अनेक माध्यमांची कमी नाही, पण काहीच प्रोजेक्ट चांगले असतात. जे प्रेक्षकांना आवडू शकतील…’ असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील खंत व्यक्त केली.

कल्की हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची दुसरी पत्नी आहे. अनुराग कश्यप याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात गाय हर्शबर्ग याची एन्ट्री झाली. अभिनेत्री सध्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. कल्की कायम लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील कल्की हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, कल्की ‘खो गए हम कहां’, ‘सॅम बहादुर’ आणि ‘मेड इन हेवन’ सीरिजच्या दुसऱ्या भागात दिसली. ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमानंतर कल्की हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सध्या सर्वत्र कल्की हिची चर्चा रंगली आहे.