मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि त्यामुळेच पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ‘गदर 2’च्या निमित्ताने बॉलिवूडला अच्छे दिन आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तर स्वातंत्र्यादिनी रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘गदर 2’ने सर्वांनाच थक्क केलं. सीक्वेलच्या या तुफान यशादरम्यान आता चाहत्यांमध्ये ‘गदर 3’ची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडलं आहे.
2001 मध्ये ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटातून तारा सिंग आणि सकिनाची क्रॉस बॉर्डर लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली होती. तेव्हा सुद्धा या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घालता होता. आता 22 वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, “तुम्हाला गदर 3 साठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. संयमाचं फळ गोड असतं, अगदी गदर 2 सारखंच. माझ्या आणि शक्तीमानजी (गदर 2 चे लेखक) यांच्या मनात काही विचार आले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त प्रतीक्षा करा, सर्वकाही होईल.”
CREATES HISTORY ON INDEPENDENCE DAY… Highest-ever biz on *15 August*… Yes, #Gadar2 hits the ball out of the stadium on #IndependenceDay… Fri 40.10 cr, Sat 43.08 cr, Sun 51.70 cr, Mon 38.70 cr, Tue 55.40 cr. Total: ₹ 228.98 cr. #India biz… BLOCKBUSTER RUN continues.#Gadar2… pic.twitter.com/u3jJZpa5Je
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2023
‘गदर 2’ या चित्रपटाच्या अखेरीस ‘जारी रहेगा..’ असं म्हटलं गेलंय. त्यामुळे याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच अनिल शर्मा यांच्या वक्तव्याने आता त्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र गदरच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकांना 22 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती. आता तिसऱ्या भागासाठी इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागू नये, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने 55.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये पाचव्या दिवसाची कमाई सर्वांत जास्त आहे.
शुक्रवार- 40.10 कोटी रुपये शनिवार- 43.08 कोटी रुपये रविवार- 51.70 कोटी रुपये सोमवार- 38.70 कोटी रुपये मंगळवार- 55.40 कोटी रुपये एकूण- 228.98 कोटी रुपये