Natasa Stankovic Cryptic Post: अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांनी 2020 मध्ये गुपचूप लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. लग्नानंतर नताशा – हार्दिक यांनी मुलाचं जगात स्वागत केलं. मुलाच्या जन्मानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नात दोघांच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला. पण हार्दिक – नताशा आणि त्यांच्या कुटुंबियांचं आनंद फार काळ टिकलं नाही. हार्दिक – नताशा यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.
घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांना नताशा हिच्यावर निशाणा साधला. पण काही दिवसांनंतर हार्दिक अभिनेत्री आणि ब्रिटिश सिंगर जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याची चर्चांनी जोर धरला. याच दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाचं खरं कारण देखील समोर आलं. आता नताशा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
घटस्फोटानंतर नताशा सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करत असते. आता एक क्रिप्टिक पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रेम दयाळू आणि धैर्यवान आहे. प्रेम कधीचं अहंकार करत नाही. प्रेम कधी मागितलं जाऊ शकत नाही. किंवा प्रेमाचे कोणते रेकॉर्ड आपण ठेऊ शकत नाही… काय बरोबर आहे काय चुकीचं आहे… कोणी सांगू शकत नाही…’
‘प्रेम कधीच तुमचा अपमान करत नाही… प्रेम कायम तुमचं रक्षण करतं.. प्रेम कधीच माघार घेत नाही… प्रेम फेल होत नाही…’ अशी पोस्ट नताशा हिने पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकला देखावा करायला प्रचंड आवडतं. त्याची हाय-प्रोफाईल इमेज नताशावर भारी पडत होती. गेल्या अनेक वर्षांपासून नताशा नात्यामध्ये प्रेम टिकवण्याचा प्रयत्न करत होती. पण दोघांमधील अंतर इतकं वाढलं की, अखेर नताशा हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोट घेण्याआधी नताशा हिने अनेकदा निर्णय घेतला. आजही घटस्फोटाचं दुःख नताशा पचवू शकलेली नाही… अशी माहिती दोघांच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळाली.
घटस्फोटानंतर नताशा तिच्या मायदेशी निघून गेली आहे. नताशा हिने मुलासोबत भारत सोडलं आहे. मुलाचा वाढदिवस देखील अभिनेत्रीने एकटीने साजरा केला. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नताशा मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.