महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बिग बी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान याला मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे…
सांगायचं झालं तर, फरार गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्यामुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि त्यांच्या टोळीने सलमान खान याच्यासोबत अनेक सेलिब्रीटींना धमकावल्याची माहिती समोर आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील काहींनी सलमान खान याच्या घरावर गोळीबार देखील केला. घडलेल्या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना गेल्या एक वर्षापासून लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवेमारण्याचा धमक्या येत आहेत. त्यामुळे भाईजान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. यावर खुद्द सलमान खान याने स्पष्टीकरण दिलं होतं. ‘सतत येत असलेल्या धमक्यांमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे…’ असं अभिनेता पोलीस चौकशीत म्हणाला होता.
सलमान खानचे वडील सलीम खान यांना देखील एका महिलेने काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती. सलीम खान एका कट्ट्यावर बसले होते तेव्हा, एक बुरखा घातलेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत आली आली सलीम खान यांना म्हणाली, ‘लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?”. याप्रकरणी देखील पोलीसांनी कारवाई केली.
पण धमकी देणाऱ्या महिलेचा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीशी कोणताही संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सलमान खानच्या वडिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूडमध्ये घडत असलेल्या अशा घटनांमुळे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असवी… अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.