टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रेशन दिसतंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इंडिया टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. हेच नाहीतर रात्रभर सेलिब्रेशन सुरू होते. बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी सामन्याचे व्हिडीओ देखील शेअर केले. बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, वर्ल्ड चॅम्पियन भारत…, भारत माता की जय… जय हिंद, जय हिंद, जय हिंद… याशिवाय अमिताभ बच्चन यांनी त्यांनी लिहिले की, उत्साह…भावना…सगळे घडले…पण मी टीव्ही पाहिला नाही, कारण जेव्हा मी पाहतो तेव्हा आपण हारतो…
आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मी ज्यावेळी भारताचा सामना बघतो, त्यावेळी भारत हारतो म्हणून मी सामना पाहत नाही. फक्त अमिताभ बच्चन यांनीच नाही तर आलिया भट्ट हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.
आलिया भट्ट हिने एक फोटो शेअर करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपण जिंकल्याचे आलिया भट्ट हिने लिहिले. जवळपास सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केलाय. अनुष्का शर्मा हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. अनुष्का शर्मा हिने विराट कोहलीचा फोटो शेअर केला.
अनुष्का शर्माने विराट कोहलीचा तिरंगा आणि ट्रॉफीसोबतचा फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील दिले. अनुष्का शर्मा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर सर्वजण कमेंट करताना देखील दिसत आहेत. जगभरातून लोक टीमला शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रत्येक भारतीयासाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण नक्कीच आहे.