भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिक – नताशा यांचं घटस्फोट झालं आहे. 2024 च्या सुरुवातीपासूनच नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. नताशा हिने मुलासोबत भारत सोडल्यानंतर हार्दिक याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर हार्दिक पोटगी स्वरूपात नताशा हिती किती संपत्ती देईल अशी चर्चा देखील रंगत आहे…
हार्दिक – नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. दोघांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. एवढंच नाही तर, दोघांनी देखील कमेंट सेक्शन बंद केलं आहे. पण एक्सवर (ट्विटर) हार्दिक – नताशा यांच्याबद्दल नेटकऱ्यांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत. सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी हार्दिक याने स्वतःच्या संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
एक्सवर हार्दिक याची एक मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत हार्दिक त्याच्या संपत्तीबद्दल बोलताना दिसत आहे. ‘माझ्या वडिलांची संपत्ती आईच्या नावावर आहे. तर माझी आणि भावाची संपत्ती देखील आमच्या आईच्या नावावर आहे… सर्वकाही आईच्या नावावर आहे. कार, घर आणि सर्वकाही… मी माझ्या नावावर काहीही ठेवलं नाही. पुढे जावून मला कोणाला 50 टक्के द्यायचे नाहीत…’ हार्दिक याची जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
First Shikhar Dhawan, then Dinesh Karthik and now this happened with Hardik Pandya😢
Natasha will get 70% of Honda’s property:😈
Hardik Pandya is completely broken 💔💔😥#HardikPandya | #Natasha | #Divorce #NatasaStankovic pic.twitter.com/aH8dyi8Rfi— Vandana Meena (@vannumeena0) May 26, 2024
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘आता नताशाला काहीही मिळणार नाही…, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे तर होणारच होतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
हार्दिक पांड्या याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटपटूची नेटवर्थ 11.4 मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार 95 कोटी रुपये… शिवाय जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हार्दिक कोट्यवधींची कमाई करतो. मीडिया रिपॉर्टनुसार, दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक याला संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशा हिला द्यावा लागेल… अशी देखील चर्चा आहे.
‘4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नातं टिकवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले आणि आम्हाला विश्वास आहे की, हा निर्णय आमच्या दोघांसाठी योग्य आहे. आमच्यासाठी हा कठीण निर्णय होता.’
‘आम्हा दोघांसाठी हा निर्णय घेणं फार कठीण होतं. आम्ही एकत्र असताना आनंदात राहिलो. एकमेकांचा सन्मान केलं. मित्रांसारखं राहिलो आणि कुटुंब म्हणून आयुष्यात पुढे आलो. अगस्त्य आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तो कायम आमच्या केंद्रस्थानी असेल. त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही.. याची आम्ही दोघं पालक म्हणून काळजी घेऊ…’ असं देखील दोघे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दोघांच्या निर्णयाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.