तिसऱ्या घटस्फोटानंतर १९ वर्ष लहान तरुणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिपलॉक फोटो व्हायरल

| Updated on: Jul 08, 2024 | 7:52 PM

प्रसिद्ध अभिनेत्रीने आता तिचे नाते इंस्टाग्रामवर जाहीर केले आहे. ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा 19 वर्षांनी मोठी आहे आणि तिसऱ्यांदा घटस्फोट घेतल्यानंतर आता ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. ती तिच्या एका सहकारी अभिनेत्याला डेट करत आहे. तिने दोघांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

तिसऱ्या घटस्फोटानंतर १९ वर्ष लहान तरुणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिपलॉक फोटो व्हायरल
Follow us on

प्रेमासमोर ना धर्म आडवा येता ना वय. अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी वयापेक्षा लहान व्यक्तीसोबत विवाह केला आहे. जेव्हा मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असते तेव्हा त्याची चर्चा होते. बलिवूडमध्ये असे अनेक जोडपी आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही सध्या जिवंत उदाहरण आहेत. मलायका अर्जुनपेक्षा मोठी असल्याने अनेक वर्षांपासून दोघेही ट्रोल झाले होते. पण आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री १९ वर्षाच्या तरुणांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा आवडला आहे. या अभिनेत्रीने तिच्यापेक्षा जवळपास निम्म्या वयाच्या मुलासोबत नाते जाहीर केले आहे. ही अभिनेत्री 48 वर्षांची आहे, तर तिचा प्रियकर केवळ २९ वर्षांचा आहे. म्हणजेच अभिनेत्री ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे तो तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे. या अभिनेत्रीचे नाव किम मार्श आहे आणि आता ती तिचा को-स्टार सॅम्युअल थॉमसच्या प्रेमात पडली आहे.

अभिनेत्री किम मार्शच्या आयुष्यात प्रेमाने पहिल्यांदाच दार ठोठावलेले नाही. याआधी अभिनेत्रीचे तीन वेळा लग्न झाले आहे. आता तिसरे लग्न संपून फक्त एक वर्ष उलटले आहे की तिने नवीन नात्याची घोषणा केली आहे. किम मार्शने आता तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये किम मार्श तिचा को-स्टार सॅम्युअल थॉमससोबत लिप लॉक करताना दिसत आहे.

ही पोस्ट शेअर करताना किम मार्शने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Met the most amazing man ever! कधीकधी सर्वात अनपेक्षित गोष्टी सर्वात अनपेक्षित वेळी घडतात. सॅम्युअल थॉमस, मी तुझ्यावर प्रेम करते.’ किम एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री, गायिका आणि टीव्ही अँकर आहे.  ‘द लॉस ॲडजस्टर’ या चित्रपटात तुम्ही तिला पाहिले असेलच. याशिवाय ती पॉपस्टार्स, डॉक्टर्स, होल्बी सिटी, वॉटरलू रोड आणि स्ट्रिक्टली कम डान्सिंग या शोमध्ये दिसली आहे.