दीपिका पादुकोणनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या घरी हालणार पाळणा? ते फोटो अखेर व्हायरल, अभिनेत्री..

| Updated on: Mar 05, 2024 | 2:06 PM

दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच मोठी घोषणा केली. दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देईल. यानंतर सर्वजण दीपिका पादुकोण हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. दीपिका पादुकोण ही अंबानींच्या पार्टीत धमाल करताना देखील दिसली.

दीपिका पादुकोणनंतर या अभिनेत्रीच्या घरी हालणार पाळणा? ते फोटो अखेर व्हायरल, अभिनेत्री..
Follow us on

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी काैशल हे अंबानींच्या पार्टीत पोहचले होते. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचा एक व्हिडीओही व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ ही जान्हवी कपूर हिच्यासोबत गप्पा मारताना दिसली. यावेळी बाजूला विकी काैशल हा देखील असल्याचे दिसले. कतरिना कैफ ही यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये दिसली. फक्त कतरिना कैफ आणि विकी काैशलच नव्हे तर जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे या पार्टीसाठी जामनगरमध्ये दाखल झाले. या पार्टीत बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी धमाकेदार असे डान्स केले. तीन खान पहिल्यांदाच एकत्र जबरदस्त असा डान्स करताना दिसले.

आता अंबानींच्या पार्टीत पोहचलेले सर्व कलाकार हे मुंबईमध्ये दाखल होताना दिसत आहेत. विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली. दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.

आता दीपिका पादुकोण हिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू असतानाच आता कतरिना कैफ हिच्या प्रेग्नंसीबद्दल देखील विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर कतरिना कैफ हिचे विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोवरून अशी चर्चा सुरू झालीये की, कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे.

कतरिना कैफ किंवा विकी काैशल यांच्याकडून प्रेग्नंसीबद्दल काहीच भाष्य हे करण्यात नाही आले. खरोखरच कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे का? हा प्रश्न चाहत्यांकडून सातत्याने विचारला जातोय. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये यांचे लग्न झाले.

कतरिना कैफ आणि विकी काैशल हे कायमच चर्चेत असतात. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. विकी आणि कतरिना कैफ यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले आणि लग्न केले. कतरिना कैफ ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.