बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे तर दुसरीकडे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर यांनी एकाच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, त्यांच्या चित्रपटाला काहीच धमाका करण्यास यश मिळाले नाही. सुहाना खान ही सध्या चांगलीच चर्चेत दिसत आहे. हेच नाही तर सुहाना ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुहाना खान दिसते.
अनन्या पांडे हिच्या वेब सीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सुहाना खान ही अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत पोहोचली. यावेळी दोघेही एकमेकांसोबत फिरताना दिसले. अगस्त्य नंदा हा सुहानाच्या मागेच दिसत होता. हेच नाही तर दोघे एकमेकांच्या कानामध्ये बोलताना देखील दिसले. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अगस्त्य नंदा आणि सुहाना खान यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अगस्त्य नंदा आणि सुहाना खान हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर दोघांनीही भाष्य केले नाहीये. त्यांचे आता व्हायरल होणारे व्हिडीओ आणि फोटो पाहून लोकांना यांची जोडी आवडताना देखील दिसत आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, खरोखरच अगस्त्य नंदा आणि सुहाना खान यांचे लग्न व्हायला पाहिजे… खान आणि बच्चन कुटुंबियामध्ये लग्न अजून काय पाहिजे? .दुसऱ्याने लिहिले की, दोघेही एकसोबत छान दिसतात. तिसऱ्याने लिहिले की, दोघांचीही जोडी छान वाटत आहे..पण अमिताभ बच्चन या लग्नाला मान्यता देतील का?
अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन हिचा मुलगा आहे. अगस्त्य नंदाचे वडील निखिल नंदा हे प्रसिद्ध बिझनेसमॅन आहेत. विशेष म्हणजे अगस्त्य नंदा हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत अगस्त्य नंदा आणि सुहाना यांच्या अफेअरच्या चर्चा या रंगताना दिसत आहेत.