‘ती माझी…’, सुहाना खानसोबत असलेल्या नात्यावर बिग बींच्या नातवाची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jan 07, 2023 | 1:08 PM

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य आणि शाहरुख खानची लेक सुहाना रिलेशनशिपमध्ये? बिग बींचा नातवाने सांगितलं सत्य

ती माझी..., सुहाना खानसोबत असलेल्या नात्यावर बिग बींच्या नातवाची मोठी प्रतिक्रिया
'ती माझी...', सुहाना खानसोबत असलेल्या नात्यावर बिग बींच्या नातवाची मोठी प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना अद्याप प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नसली, तर तिच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. सध्या किंग खानची लेक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शाहरुखची लेक सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे. एवढंच नाही, तर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल असलेलं सत्य गुपित ठेवलं आहे.

मीडियारिपार्टनुसार, आगस्त्य नंदाने सुहानासोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना आणि अगस्त्य ख्रिसमस पार्टीसाठी एकत्र दिसले होते. तेव्हा सुहाना अगस्त्यच्या कुटुंबाला भेटली होती. तेव्हा अगस्त्यने सुहानाची ओळख ‘ती माझी पार्टनर आहे..’ अशी करून दिली. अगस्त्यच्या वक्तव्यानंतर सुहानाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

श्वेता बच्चन यांनी देखील दिला अगस्त्य आणि सुहानाच्या नात्याला दुजोरा

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींची लेक श्वेता नंदाला देखील सुहाना फार आवडते. श्वेताने देखील सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याला दुजोरा दिला होता. पण अद्याप दोघांनी त्यांचं नातं सर्वांसमोर कबुल केलेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुहाना आणि अगस्त्य ‘द अर्चिज’ (The Archies) सिनेमातून अभिनयास सुरुवात करणार आहे.

 

 

सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सुहाना आणि अगस्त्य यांच्यामध्ये प्रेमाचं गुलाब फुलल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमात दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द अर्चिज’ सिनेमात सुहाना आणि अगस्त्य यांच्यासोबतच अन्य स्टार किड्स देखील झळकणार आहे. श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये अगस्त्य नंदा – आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर – बेट्टी कपूर आणि सुहाना खान – वेरोनिका लोज म्हणून झळकणार आहेत.सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे सुहाना आणि अगस्त्य त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर कधी करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.