मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | सोशल मीडियावर रोज वेग-वेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो… येवढी शक्ती सोशल मीडियामध्ये आहे. सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता अभिनेत्री विद्या बालन हिने देखील असंच काही केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिची चर्चा आहे. रुपेरी पडद्यावर विद्याने आपल्या हटके अभिनयाने चाहत्यांना हसवलं, रडवलं, भावुकही केलं. पण आता विद्या हिने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, तो व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल…
विद्या बालन हिने मराठी सिनेविश्वातील भाऊ कदम यांच्या एका व्हायरल व्हिडीओवर स्वतः अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे… ‘सिगारेट ओढता का, दारु पिता का…’ यावर विद्या हिने एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘ऐका हो ऐका..’ असं लिहिलं आहे.
चाहत्यांना देखील विद्या बालन हिचा हटके अंदाज प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिचीच चर्चा सुरु आहे. विद्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील विद्याच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
विद्या बालन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत असतात.
विद्या बालन सिनेमे
विद्या बालन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘द डर्टी पिक्चर’ मुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. ‘परिणीता’, ‘शकुंतला देवी’, ‘तुम्हारी सुलू’, ‘भूल भूलैय्य’, ‘मिशन मंगल’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘कहानी’, ‘नियत’, ‘बेगम जान’, ‘किस्मत कनेक्शन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये विद्या हिने महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.