Aishwarya Divorce : रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुष यांनी 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहेत. आता या जोडप्याने चेन्नई फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या दोन्ही स्टार्स कलम 13B अंतर्गत घटस्फोट घेत आहेत. त्यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होऊ शकते.
धनुष आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. त्यांनी 2022 मध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. 2 वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.
धनुषने ट्विट केले होते की- ‘१८ वर्षांचा प्रवास छान राहिलाय. पण आता आम्ही जिथे उभे होतो तिथून मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय.’ धनुषचे हे ट्विट त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. धनुष आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी मोठा धक्का होती. ही जोडी पुन्हा एकत्र येईल अशी चाहत्यांना आशा होती. पण तसे झाले नाही. दोघांना दोन मुलं आहे.
ऐश्वर्याने सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर केली होते. विभक्त होण्याच्या संघर्षात दोघांनीही लोकांना त्यांची गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांनी 2004 मध्ये विवाह केला होता. तेव्हा त्यांचे वय 21 आणि 23 वर्ष होते. पण वेगळे झाल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलेय. धनुष त्याच्या आगामी चित्रपट आणि दिग्दर्शनात व्यस्त आहे. ‘रायन’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे.
ऐश्वर्या हिने अलीकडेच ‘लाल सलाम’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केले आहे. तर ‘कॅप्टन मिलर’ सिनेमामधून धनुष शेवटचा दिसला होता.