आराध्यासोबत अबरामचा परफॉर्मन्स; शाळेतल्या मुलांसोबत शाहरुखही थिरकला, पहा व्हिडीओ

| Updated on: Dec 20, 2024 | 9:48 AM

धिरुभाई अंबानी शाळेचा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चनने खास परफॉर्म केलं. तिच्यासोबत शाहरुखचा मुलगा अबरामसुद्धा दिसला.

आराध्यासोबत अबरामचा परफॉर्मन्स; शाळेतल्या मुलांसोबत शाहरुखही थिरकला, पहा व्हिडीओ
अभिषेक-ऐश्वर्या, आराध्या
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींची मुलं धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. त्यामुळे जेव्हा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, तेव्हा सेलिब्रिटींची मांदियाळी त्यात पहायला मिळते. हे स्टारकिड्स स्टेजवर परफॉर्म करतात आणि त्यांचे आईवडील अभिमानाने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताना, त्यांचं कौतुक करताना दिसतात. नुकताच या शाळेत वार्षिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनने स्टेजवर परफॉर्म केलं. यावेळी तिच्यासोबत शाहरुख खानचा मुलगा अबरामसुद्धा होता. या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आराध्या आणि अबरामने ख्रिसमसशी संबंधित एक नाटक सादर केलं. या नाटकात आराध्याने आजीची भूमिका साकारली होती. या दोघांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या खूप खुश झाले. ऐश्वर्या लेकीच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होती. त्याचप्रमाणे ती टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन देताना दिसली. तर शाहरुखसुद्धा त्याच्या मुलाचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करताना दिसला. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासुद्धा त्याच्यासोबत होते. धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात आराध्या स्टार परफॉर्मर ठरली, यात काही शंका नाही. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

आराध्याने गेल्या वर्षीसुद्धा स्टेजवर परफॉर्म करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यंदाही आराध्या या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिली. याशिवाय अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या तैमुर आणि जहांगीर या दोन्ही मुलांनी स्टेजवर परफॉर्म केलं. शाहिद कपूर आणि मीरा राजपूतसुद्धा त्यांच्या मुलांसोबत या कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी शाहरुखने सर्व मुलांसोबत मिळून डान्ससुद्धा केला. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दिवानगी’ या गाण्यावर तो थिरकताना दिसला. शाहरुखसोबत इतर सेलिब्रिटीसुद्धा नाचताना दिसले.