अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी केलेल्या पोस्टमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांना लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत आनंदी पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक दोघांनी देखील इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या – अभिषेक यांनी सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जवळपास 8 तासांपूर्वी ऐश्वर्या – अभिषेक यांनी फोटो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या – अभिषेक यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या – अभिषेक यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत. फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ईशा देओल, बॉबी देओल, रितेश देशमुख, अंकुर भाटिया, डब्बू मलिक, इनायत वर्मा, रणविजय सिंघा, लिजेस डिसूजा यांनी देखील ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्नाच्या 17 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्या – अभिषेक यांचा आराध्या हिच्यासोबत फोटो पाहिल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला पुन्हा एकदा पाहिल्यानंतर आनंद झाला आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडमधील बेस्ट कुटुंब…’
ऐश्वर्या – अभिषेक यांच्यासोबत असलेल्या आराध्या हिचा नवा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या सुंदर दिसत आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिघांना एकत्र पाहून आनंद वाटत आहे…’, ‘आराध्या पूर्णपणे तिच्या वडिलांसारखी दिसते…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या तुमच्या दोघांच्या पाऊलावर पाऊल ठेवत यशाच्या शिखरावर पोहोचेल…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.