अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशात बच्चन कुटुंब आणि स्वतः ऐश्वर्या – अभिषेक यांनी देखील रंगणाऱ्या चर्चांवर मौन बाळगलं आहे. रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण इशाऱ्यांनी दोघांनी चाहत्यांना अनेक गोष्टी सांगितल्या आहे. नुकताच, ऐश्वर्या हिच्या बोटत अंगठी दिसली नाही, त्यामुळे देखील दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सोशल मीडियावर असे देखील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामुळे दोघांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे.
ऐश्वर्या-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये तुफान रंगत आहेत. पण दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. IIFA मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुरस्कार सोहळ्यात अभिषेक याने पहिल्यांदा लेक आराध्या हिच्यासमोर परफॉम केलं होतं.
व्हिडीओमध्ये अभिषेक ऐश्वर्या हिचं कौतुक करताना दिसतोय, ‘आराध्याची आई प्रचंज अमेझिंग आहे…’ त्यानंतर मनीष पॉल ऐश्वर्याकडे येतो आणि विचारतो तेव्हा अभिनेत्री म्हणते, ‘अभिषेक स्टेजवर येत होता तेव्हा त्याचाच बोलबाला होता… यू रॉक इट बेबी…’ यावर अभिषेक म्हणतो, ‘हेच कारण आहे ज्यामुळे ऐश्वर्या संपूर्ण जगात बेस्ट आहे…’, सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. कारण पूर्वी कायम अभिषेक आणि आराध्या हिच्यासोबत दिसणारी ऐश्वर्या आता सर्वत्र फक्त लेकीसोबत दिसते. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवाय अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील अभिषेक कुटुंबासोबत तर, ऐश्वर्या एकटी लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. ज्यामुळे अनेकांनी अभिषेक याला ट्रोल केलं होतं.
अभिनेता सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.