अभिनेत्री ऐश्वर्या राय आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री एक्स-बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता विवेक ओबेरॉय याची एन्ट्री झाली. पण दोघांचे रिलेशनशिप फक्त 2 वर्ष टिकलं. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विवेक याने झालेल्या अपघाताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तेव्हा विवेक याच्या मदतीसाठी अभिषेक बच्चन धावून गेला होता.
विवेक याचा अपघात झाला तेव्हा ‘युवा’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. सिनेमात विवेक, अभिषेक मुख्य भूमिकेत होते. जुने दिवस आठवत विवेक म्हणाला, ‘दिवसाची सुरुवात फार छान झाली होती. पण एका भयानक अपघातामुळे मी गंभीर जखमी झालो. तीन ठिकाणी माझ्या पायाला दुखापत झाली होती.’
‘मला आठवत आहे की, तेव्हा अजय देवगन आणि अभिषेक बच्चन माझ्या मदतीसाठी आले होते. ते मला रुग्णालयात घेऊन गेले. मी पूर्ण रक्त बंबाळ अवस्थेत होतो. नंतर मला कळलं, माझा अपघात पाहिल्यानंतर दिग्दर्शक मणिअन्ना यांना हार्ट अटॅक आला… दोघांवर एकाच रुग्णालयात उपचार सुरु होते.’
‘अजय आणि अभिषेक माझ्यासोबतच होता. मला काहीही कळत नव्हतं इतका त्रास मला होत होता. पण पेन किलर आणि दोघांच्या विनोदांमुळे मला हिम्मत मिळत होती. सिनेमाची शुटिंग बंद करण्यात आली होती. अखेर चार महिन्यांनंतर पुन्हा सर्वकाही सुरळीत सुरु झालं. माझी प्रकृती पूर्ण स्थिर झाली नव्हती. कधीकधी असं वाटतं मी एवढं सगळं कसं करु शकलो…’ सध्या सर्वत्र विवेक ओबेरॉय याची चर्चा रंगली आहे.
‘युवा’ सिनेमात अजय, अभिषेक आणि विवेक यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई तर केलीच पण तिघांच्या करियरसाठी देखील सिनेमा महत्त्वाचा ठरला. त्यानंतर तिघांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
दरम्यान, विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये आराध्या हिचा जन्म झाला. ऐश्वर्या आता तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.