मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री अशी ओळख असलेली ऐश्वर्या राय-बच्चन सध्या मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कधी पर्सनल आयुष्यामुळे, पण ‘ॲश’ची नेहमीच चर्चा होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच अफवा उठत आहेत. बच्चन कुटुंबियांची सून असलेली ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसून ते वेगळे होणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच ऐश्वर्याने लेक आराध्यासह बच्चन कुटुंबाचे घर सोडले असून ती आईसोबत रहात असल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र बच्चन कुटुंब, अभिषेक किंवा ऐश्वर्या यांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
याच सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याचा आणि तिच्या भावाचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायने एक मोठं विधान केलं होतं, ते ऐकून ऐश्वर्या खूप रागावली देखील. तिचा भाऊ नक्की असं काय म्हणाला की, क्षणात ऐश्वर्याचे एक्स्प्रेशन्स बदलले ? चला जाणू घेऊया.
ऐश्वर्याच्या या सवयीमुळे भाऊ झाला हैराण
खरंतर ऐश्वर्या राय बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये आली होती. तेव्हा तिचे कुटुंबीयही सोबत आले होते. तेव्हा फारुख शेख यांनी ऐश्वर्याचा भाऊ आदित्यची मुलाखत घेत त्याला काही प्रश्न विचारले होते. ऐश्वर्याची अशी कोणती सवय आहे जी तुला आवडत नाही ? असा प्रश्न आदित्यला विचारण्यात आला होता.
उत्तर ऐकताच ऐश्वर्या झाली नाराज
तेव्हा आदित्याने उत्तर दिलं की, ऐश्वर्या खूप अहंकारी आहे. त्याचं ते उत्तर काही ऐश्वर्याला आवडलं नाही आणि ती नाराज झाल. तिच्या चेहऱ्यावर विचित्र एक्स्प्रेशन्स आले. पण ते तिने मजेत दिले होते. पण त्यानंतर ऐश्वर्याच्या भावाने लगेच मुद्दा कव्हर केला. त्यानेही हसून त्याचे शब्द बदलले आणि म्हणाला, हो ती जरा गर्विष्ठ आहे पण छान पण आहे. यानंतर ऐश्वर्या म्हणाली, या सगळया गोष्टी तर कॉमन आहेत, सगळीकडेच हे पहायला मिळतं ना. खरंतर ही छोटीशी नोकझोक होती. ऐश्वर्याचं तिच्या भावावर खूप प्रेम आहे आणि तिच्या भावाचाही तिच्यावर खूप जीव आहे. वेळ मिळताच ऐश्वर्या तिच्या भावाला आणि कुटुंबियांना भेटायला जात असते.