मुंबई | 5 डिसेंबर 2023 : कधी विमानतळ, तर कधी पुरस्कार सोहळा… कोणत्याही ठिकाणी अभिनेत्री ऐश्वर्या राय लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचते. सांगायचं झालं तर बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्य चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सक्रिय चर्चेत असतो. पण ऐश्वर्या आणि लेक आराध्या बच्चन यांच्या चर्चा तर कायम रंगत असतात. ऐश्वर्या आणि आराध्या यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडीओ ऐश्वर्या लेकीला सांभाळताना दिसते. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे.
व्हारयल होत असलेल्या व्हिडीओ आराध्या आणि ऐश्वर्या ‘कयामत… कयामत’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील देघींचा डान्स प्रचंड आवडला आहे. चाहते दोघांच्या डान्सवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जिनिलिया डिसुझा देखील दिसत आहे.
आराध्या हिच्याबद्दल सांगयचं झालं तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय – अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आणि महानायक अमिताब बच्चन – अभिनेत्री जया बच्चन यांनी नात आराध्या बच्चन प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड आहे. बच्चन कुटुंबाची लेक असल्यामुळे आराध्या हिची कायम चर्चा रंगलेली असते. एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन देखील कायम नातीबद्दल अनेक ठिकाणी बोलताना दिसतात.
आराध्या सध्या तिचं शालेय घेत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेत आराध्या तिचं शिक्षण घेत आहे. लेक आराध्याच्या शिक्षणासाठी बच्चन कुटुंबियांनी धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची निवड केली आहे. आराध्या हिचे शाळेतील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात..
आराध्या हिचा जन्म 2011 मध्ये झाला. नुकताच आराध्या हिच्या वाढदिवस झाला. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐश्वर्या हिने लेकीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. ‘मी फक्त तुझ्यासाठी जगत आहे…’ असं वक्तव्य ऐश्वर्या राय हिने लेकीसोबत फोटो पोस्ट करत केलं होतं.
ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षांव करत असतात.