Aaradhya Bachchan dance: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आराध्या फक्त 13 वर्षांची आहे. सध्या आराध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आराध्या अभिनेता शाहरुख खान याचा लहान मुलगा अबराम खान याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र आराध्या आणि अबराम यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर आराध्या आणि अबराम यांचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शाळेतील क्रार्यक्रामाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शाळातील अन्य विद्यार्थी देखील आहे. पण आराध्या आणि अबराम यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सांगायचं झालं तर, आराध्या आणि अबराम यांच्या वयात फार अंतर नाही. आराध्या 13 वर्षांची आहे तर, अबराम 11 वर्षांचा आहे. व्हिडीओमध्ये आराध्या आणि अबराम यांच्यामध्ये असलेली मैत्री दिसून येत आहे. दोघेही शाळेच्या फन्क्शन्समध्ये एकत्र सहभागी होतात आणि आराध्याही अबरामसोबत ट्रिपला जाते.
आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्याची लेक धीरुबाई अंबानी स्कूलमध्ये शिकत आहे. शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आराध्या कायम भाग घेत असते. सोशल मीडियावर आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक असल्यामुळे आराध्या कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याची देखील चर्चा आहे.
शाहरुख खान याचा लहान मुलगा अबराम देखील धीरुबाई अंबानी स्कूलमध्ये शिकत आहे. अनेक ठिकाणी अबराम याला देखील स्पॉट करण्यात येतं. शिवाय अबराम याचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.