बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंब प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एका आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन… कायम त्यांच्या सिनेमांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात वाद सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, गेले 15 दिवस ऐश्वर्या लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये होती. नुकताच अभिनेत्री भारतात पोहोचली आहे. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने पापाराझींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये नक्की सुरु तरी काय आहे? दोघांमध्ये काही मतभेद आहेत, की रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत? अनेक अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले. मुलीसोबत भारतात परतल्यानंतर ऐश्वर्या हिने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, ज्या प्रतीक्षेत चाहते होते. सांगायचं झालं तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या – अभिषेक वेग-वेगळे पोहोचले. त्यानंतर अभिषेक याने सोशल मीडियावर एका घटस्फोटासंबंधी पोस्ट लाईक केली. ज्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.
घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असतान, ‘ताल’ फेम अभिनेत्री ऐश्वर्या पापाराझींसोबत आनंदी मूडमध्ये दिसून आली. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्रीला पापाराझींनी ‘गुड मॉर्निंग’ देखील केलं… तर अभिनेत्रीने देखील हसून सर्वांना उत्तर दिलं.
पुढे एकाने विचारले, ‘मॅम तुम्ही कशा आहात?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सर्व काही ठिक आहे… धन्यवाद..,’ तर एकाने अभिनेत्रीसोबत फोटो क्लिक करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ऐश्वर्या हिने लेका आराध्या हिला सुरक्षित कारमध्ये बसवलं आणि पापाराझींसोबत पोज दिली. फोटो क्लिक केल्यानंतर ऐश्वर्या सर्वांना ‘गॉड ब्लेस’ म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि ऐश्वर्या हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशात नुकताच अभिनेत्री ‘सर्व काही ठिक आहे…’ असं पापाराझींना सांगितलं. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2007 मध्ये अभिषेक याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला.