सध्या सोशल मीडिया अकाऊंट उघडलं की थेट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात पोहोचल्यासारखं वाटतं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने शनिवारी रात्री राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री ऐश्वर्या रायसुद्धा अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला लेक आराध्यासोबत पोहोचली होती. एकीकडे बच्चन कुटुंबीयांसोबत ऐश्वर्या का आली नाही, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता सोशल मीडियावर तिच्या आणखी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ही अभिनेत्री दीपिका पादुकोणला मिठी मारताना दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर दीपिकाची गळाभेट घेताना ऐश्वर्याचे डोळे पाणावलेले दिसले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ ऐश्वर्या ही गरोदर असलेल्या दीपिकाला मिठी मारतेय. त्यानंतर ती दीपिकाच्या कानात काहीतरी बोलत असते. हे बोलताना ऐश्वर्या भावूक झाल्याचं स्पष्ट पहायला मिळतंय. या दोघांमधील खास नात्याची झलक या व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांना पहायला मिळाली. यावेळी दीपिका आणि ऐश्वर्याच्या मागेच अभिनेता हृतिक रोशन उभा आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. तर येत्या सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे.
such a long wholesome hug 🥹 pic.twitter.com/HF96b6KB9Y
— kp (@earthlykisssed) July 13, 2024
ऐश्वर्या आणि दीपिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना 2018 मधील या दोघींचा एक खास क्षण आठवला. इशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये ऐश्वर्या दीपिकाचा हात खेचून तिला बाजूला नाचायला बोलावते. त्यानंतर दोघी एकमेकींसोबत मनसोक्त नाचतात. नंतर दीपिका ही आराध्यासोबतही डान्स करते.
This madness looks slayy only on deepu n ash babes 🥵🥵🥵🥹🥹🤌🤌 #DeepikaPadukone #AishwaryaRai pic.twitter.com/FsId7huTEc
— Sonaiyaah (@Sunaiyaahahaha) July 13, 2024
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील व्हायरल झालेल्या व्हिडीओंपैकी आणखी एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ही अभिनेत्री रेखा यांची भेट घेताना दिसते. या क्लिपमध्ये रेखा आणि ऐश्वर्या एकमेकींची मिठी घेतात. त्यानंतर रेखा या ऐश्वर्यासोबत काही सेकंद बोलतात आणि नंतर आराध्याच्या गालावर किस करतात. आराध्यासुद्धा अत्यंत प्रेमळपणे रेखा यांची भेट घेते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अमिताभ आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेणारा शाहरुख खान, रजनीकांत, अनिल कपूर आणि रणवीर सिंह यांचा भन्नाट डान्स, तसंच किम आणि ख्लो कार्दशियन यांचा लक्षवेधी प्रवेश, ही अनंत आणि राधिका यांच्या विवाहसोहळ्यातील खास दृश्ये ठरली. ‘वेडिंग ऑफ द इयर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या लग्नसोहळ्याला देश विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दाम्पत्याला आशीर्वाद दिले.