मुंबई | 6 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक एकत्र देखील दिसत नाहीत. अनेक ठिकाणा ऐश्वर्या आणि आराध्या यांना स्पॉट करण्यात येत होतं. दरम्यान, ‘द आर्चीज’ (The Archies) सिनेमाच्या प्रीमियर दरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंबाला एकत्र स्पॉट करण्यात आलं. ‘द आर्चीज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नातवाचा पहिला सिनेमा असल्यामुळे अगस्त्य याच्या उत्साहात बिग बी देखील उपस्थित होते.
दरम्यान, बच्चन कुटुंबाची चर्चा तुफान रंगली आहे. कारण यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय देखील लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत उपस्थित होती. सध्या प्रीमियर दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेट. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय भाचा अगस्त्य याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. पण एश्वर्या, अभिषेक याला पाहून का पाठ फिरवते? अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे.
व्हिडीओमध्ये अगस्त्य याचे फोटो काढण्यासाठी पापाराझींची गर्दी जमते. तेव्हा विनोदी अंदाजात ऐश्वर्या म्हणते, ‘अग्गी सोलो पोज…’ पुढे ऐश्वर्या मोठ्याने ओरडत म्हणते, ‘अग्गी आता याची सवय करुन घे… ‘ सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाचा व्हिडीओ व्हारयल होत आहे. नेटकरी देखील व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगत आहेत.
‘द आर्चीज’ सिनेमा
‘द आर्चीज’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमातून अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 7 डिसेंबर रोजी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अगस्त्य नंदा याच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान देखील सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द आर्चीज’ सिनेमा आणि बच्चन कुटुंबाची चर्चा रंगणार आहे.