बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती.
ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा रंगत असताना त्यावर कोणीही भाष्य करत नाहीये. आता नुकताच ऐश्वर्या राय ही दुबईमध्ये SIIMA 2024 मध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्याला पुरस्कार देखील मिळाला. मात्र, यावेळी ऐश्वर्या हिच्यासोबत अभिषेक बच्चन हा पोहोचला नाही. आईला सपोर्ट करण्यासाठी आराध्या बच्चन ही पोहोचली.
ऐश्वर्या राय हिने ज्यावेळी पुरस्कार घेतला त्यावेळी तिथे उपस्थित आराध्या बच्चन ही ऐश्वर्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करताना दिसली. हेच नाही तर ज्यावेळी ऐश्वर्या राय ही फोटोसाठी पोझ देत होती, त्यावेळी तिच्या बाजूला आराध्या बच्चन ही उभी दिसली. ऐश्वर्या राय ही प्रेमाने आपल्या मुलीला किस देताना दिसली.
आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्याला काहीतरी बोलत होती, त्यावेळी ऐश्वर्या राय ही अचानक मुलगी आराध्या हिला लिप्स किस देताना दिसली. आता याचेच काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून ऐश्वर्या आणि तिच्या मुलीमधील प्रेम दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचे नेहमीच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय ही आपल्या मुलीसोबत विदेशात जाताना दिसली. आराध्या बच्चन ही सतत आई ऐश्वर्या हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते. हेच नाही तर अनेकांनी म्हटले होते की, आराध्या ही शाळेत जाते की नाही? ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आराध्या ही दररोज शाळेत जाते आणि तिच्या शाळेचे व्यवस्थित नियोजन करून ऐश्वर्या तिला विदेशात घेऊन जाते.