माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या कान फिल्म फेस्टिव्हल 2024 मधील तिच्या लूकमुळे अधिक चर्चेत आहे. पण ऐश्वर्या कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. 2007 मध्ये ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण लग्नाआधी ऐश्वर्या हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेलं नातं आजही चर्चेत आहे.
‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सलमान – ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. एका मुलाखतीत सलमान याने ऐश्वर्या हिचं नाव न घेता मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझ्या एक्सगर्लफ्रेंडने जोडीदार म्हणून उत्तम व्यक्तीची निवड केली आहे.’
‘गोष्टी होऊन गेल्या आहेत आणि झालेल्या गोष्टींना फार काळ झाला आहे. मला असं वाटतं जुन्या आठवणींमध्ये रमण्यात काहीही अर्थ नाही. जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी चांगलं आहे. तुव्ही ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यापासून विभक्त होऊन दुःखी आहे तर, तुम्ही देखील आनंदी राहू शकत नाही…’
‘पण ती व्यक्ती जर आनंदी आहे तर, तुम्हाला देखील आनंदी राहाता यायला हवं.’ एवढंच नाहीतर, सलमान खान याने अभिषेक बच्चन याचं देखील कौतुक केलं होतं. ‘अभिषेक उत्तम व्यक्ती आहे. अभिषेकसोबत की आनंदी आहे. दोघे एकमेकांसाठी बनले आहेत. तिचं लग्न एका मोठ्या कुटुंबात झालं आहे. ती त्यांच्यासोबत आनंद आहे….’ असं भाईजान म्हणाला होता.
ब्रेकअप झालं म्हणून सर्वकाही संपलं असं काहीही नसतं… असं देखील सलमान खान म्हणाला होता. सांगायचं झालं तर, ब्रेकअपनंतक सलमान खान आणि ऐश्वर्या राय कधीच एकत्र दिसले नाहीत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे उपस्थित असतात, पण एकमेकांसोबत बोलत देखील नाही.
अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.