अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर अभिषेक – ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, ऐश्वर्याबद्दल अनेक जुन्या गोष्टी समोर येत असतात. एका मुलाखतीत ऐश्वर्या, ‘स्वतःसोबत शांततेत आणि आनंदी राहा…’, असं म्हणाली होती.
मुलाखतीत ऐश्वर्या हिला लेक आराध्याला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला असा वाटतं आराध्यासाठी माझा एकच सल्ला असले आणि तो म्हणजे स्वतः सोबतच शांततेत आणि आनंदाने राहा… असं केल्यामुळे आराध्या एक चांगली व्यक्ती नक्कीच होईल…’
पुढे ऐश्वर्या म्हणाली होती, ‘मी आराध्या हिला ब्यूटी टिप्स देईल… खूप पाणी पी… सकस आहार घे… आणि केसांची काळजी घे… ‘, सांगायचं झालं तर, ऐश्वर्या कायम लेक आराध्या हिच्यासोबत असते. कोणत्याही कर्यक्रमात, सोहळ्यात ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते. सोशल मीडियावर दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघांचे वादग्रस्त फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी, अभिषेक याने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधी एका पोस्ट लाईक केली होती. ज्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.
अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांचं लग्न
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला.