अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चा, कोणासोबत व्हायरल होतोय ऐश्वर्या रायचा फोटो?

| Updated on: Dec 01, 2024 | 1:27 PM

Aishwarya Rai New Viral Photo: अभिषेक बच्चन सोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना कोणासोबत व्हायरल होतोय ऐश्वर्या राय हिचा फोटो? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल होत असलेल्या फोटोची चर्चा...

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चा, कोणासोबत व्हायरल होतोय ऐश्वर्या रायचा फोटो?
Follow us on

Aishwarya Rai New Viral Photo: अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. अभिषेक याच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत असताना ऐश्वर्या राय हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या व्हायरल फोटोची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्याचा व्हायरल होत असलेला फोटो तिच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील असल्याचं सांगितलं जात आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत असणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर, मेकअप आर्टिस्ट हंकी आहे. हंकी आणि ऐश्वर्या यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

मेकअप आर्टिस्ट हंकी याने ऐश्वर्या हिच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत हंकी याने कॅप्शनमध्ये, ‘कामावर एक उत्तम दिवस…’ पोस्ट व्हायरल होत आहे. पण नव्या प्रोजेक्टबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऐश्वर्या हिने देखील कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

 

दरम्यान, अशी देखील चर्चा रंगत आहे की, ऐश्वर्या कोणत्या सिनेमासाठी नाही तर, नव्या जाहिरातीसाठी शुटिंग करत आहे. पोस्टवर एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘सिनेमासाठी शुटिंग आहे का?’ दुसरा नेटरी म्हणाला, ‘ऐश्वर्या पुन्हा पदार्पण करत आहे म्हणून आनंदी आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘राणी पुन्हा येत आहे…’ चाहते देखील ऐश्वर्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

 

ऐश्वर्याने बच्चन नाव हटवलं?

नुकताच एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या उपस्थित होती. तेव्हा अभिनेत्री बच्चन ऐवजी फक्त ‘ऐश्वर्या राय’ अशा नावाने स्वतःला संबोधित केलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. शिवाय सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असतं.