मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ऐश्वर्याला कोणत्याही ठिकाणी पाहिल्यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी आणि अभिनेत्रीसोबत फोटो काढण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र ऐश्वर्याच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा बोलबाला होता. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील ऐश्वर्या तिचकीत सुंदर दिसते. ऐश्वार्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कधीही विसरता न येणाऱ्या आठवणीबद्दल सांगितलं.
ऐश्वर्या हिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्याासाठी चाहते उत्सुक असतात. अनेक मुलाखतींच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांची प्रश्नांची उत्तर देत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. जगातील सुंदर महिलांपैकी एक असणारी ऐश्वर्या अभिनेता आणि पती अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या असं आह. दोघे अनेक ठिकाणी आराध्यासोबत दिसतात. आराध्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील ऐश्वर्या मुलीसोबत दिसले. आराध्याचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आराध्याचे शाळेतील देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
एका मुलाखतीत ऐश्वर्याने देखील तिच्या शाळेतील एक आठवण सांगितली. शालेय दिवसांमध्ये ऐश्वर्या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होती. इयत्ता दहावीमध्ये असताना ऐश्वर्याला कमी गुण मिळाले होते, ज्यामुळे अभिनेत्री ढसाढसा रडली होती.अभिनेत्री म्हणाली, ‘गुण चांगले होते, पण शाळेत अव्वल आली नव्हती म्हणून मी प्रचंड रडली होती आणि आयुष्यात तेव्हा मी एकदाच रडली होती…’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगत आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले. आज ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.