बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत असते. काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढला आहे. हेच नाही तर दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र, बच्चन कुटुंबियांपैकी यावर कोणीही काहीही भाष्य केले नाहीये.
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचेही फार चांगले नाते नसल्याचे सांगितले जातंय. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये असे काही घडले होते की, जया बच्चन यांचे बोलणे ऐकून ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यात पाणी आले आणि आपले अश्रू ऐश्वर्या राय रोखू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी फक्त जया बच्चन आणि ऐश्वर्या रायच नाही तर बच्चन कुटुंबियांपैकी अभिषेक बच्चन हा देखील उपस्थित होता.
जया बच्चन या पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी जया बच्चन म्हणाल्या की, मी एका सुंदर मुलीची सासू बनले आहे, जिच्याकडे वॅल्यूज आणि डिग्निटी आहे. मला तिचे हास्य खूप जास्त आवडते. बच्चन कुटुंबात तुझे मी स्वागत करते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, असेही म्हणताना जया बच्चन या दिसल्या. सुनेचे काैतुक करताना जया बच्चन या दिसल्या.
जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून ऐश्वर्या राय ही आपले अश्रूच रोखू शकली नाही. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी ऐश्वर्या रायचा बाजूलाच अभिषेक बच्चन हा देखील बसलाय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये अत्यंत शाही थाटात पार पडले. या लग्नासाठी कोट्यवधी रूपये खर्च देखील करण्यात आले.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाची कित्येक दिवस चर्चा रंगताना दिसली. हेच नाही तर यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही दिवस एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी देखील एकमेकांना डेट केले.