मुंबई : ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सतत सांगितले जातंय. मात्र, ऐश्वर्या राय किंवा अभिषेक यांच्याकडून याबद्दल अजिबातच भाष्य करण्यात येत नाहीये. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगण्यात आले. ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरात शिफ्ट झालीये, असे रिपोर्टमध्ये सांगितले गेले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हा टोकाला गेलाय. मात्र, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय हिच्या भावाची बायको श्रीमा राय हिने मोठे विधान केले आहे. ऐश्वर्या राय हिची भावजय श्रीमा राय सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकताच श्रीमा राय हिने मोठा खुलासा केला आहे. आता श्रीमा राय हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
श्रीमा राय म्हणाली की, मी कधीच ऐश्वर्या राय हिला एक सुपरस्टार म्हणून अजिबातच बघत नाही. माझ्यासाठी ती कायमच माझी ननंद आहे. मुळात म्हणजे माझ्यामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये कधीच कामाचे काहीच बोलणे होत नाही. मुळात म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घरी फार कमी येतात. परंतू त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवायला आवडतो.
आता तर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे एकसोबत भेटतच नाहीत. जेंव्हा ऐश्वर्या येते त्यावेळी मी कामात असते. आता ऐश्वर्या राय हिच्या भावजयच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरच घटस्फोट घेणार का हा प्रश्न चाहते सतत विचारताना दिसत आहेत. मात्र, याबद्दल खुलासा होऊ शकत नाहीये.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली होती.