मुंबई : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा जोर धरत आहे. शाहरुख ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये तब्बल चार वर्षांनी पदार्पण करत असल्यामुळे किंग खान याला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमाने विक्रम केला आहे. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिरवर काय कमाल दाखवतो, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पठाण सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगवर अजय देवगण याने वक्तव्य केलं आहे.
अभिनेता अजय देवगण सध्या आगामी ‘भोला’ सिनेमाचा दुसरा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझरमध्ये अजय त्रिशूल घेवून ऍक्शन करताना दिसत आहे. दरम्यान अजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेता किंग खानच्या पठाण सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल बोलताना दिसत आहे.
Ajay has been a pillar of support and love to me and my family for years. He is a wonderful actor and beautiful human being. Strong and silent. https://t.co/gbDD1Zc2rm
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 24, 2023
अजय देवगण म्हणतो, ‘मला असं वाटतं जो सिनेमा प्रदर्शित होईल तो सुपर डुपर हीट झाला पाहिजे. पूर्ण इंडस्ट्री एक आहे. आता पठाण प्रदर्शित होत आहे आणि पठाण सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग तुफान होत असल्याचं कळत आहे. आतापर्यंत एवढं कधी झालं नाही. म्हणून मी प्रचंड आनंदी आहे. यासाठी आपल्याला आनंदी व्हायला हवं.’ असं देखील अजय देवगण म्हणाला. अजयच्या वक्तव्यावर शाहरुखने आभार मानले आहेत.
सांगायचं झालं तर, पठाण बुधवारी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास ५० कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स तिकीटांची विक्री केली आहे. रिपोर्टुनुसार आतापर्यंत पठाण सिनेमाचे जवळपास १३ लाख तिकीटांची विक्री झाली आहे.
मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो. पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.