कंगना रनौत – अजय देवगन…, भडकलेल्या काजोलने दिलेली ‘ती’ धमकी

| Updated on: Jun 12, 2024 | 3:45 PM

Kajol - Ajay Devgn : 'बॉलिवूडमध्ये एक्स्ट्रा अफेअर असतात...', कंगना रनौत - अजय देवगण यांच्या नात्याबद्दल जेव्हा माजली होती सर्वत्र खळबळ... भडकलेल्या काजोलने दिलेली 'ती' धमकी आणि..., कंगना कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतात चर्चेत...

कंगना रनौत - अजय देवगन..., भडकलेल्या काजोलने दिलेली ती धमकी
कंगना रनौत
Follow us on

झगमगत्या विश्वात कायम लिंकअप, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट आणि एक्स्ट्रा अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण जेव्हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींबद्दल अशा काही चर्चा रंगतात तेव्हा सर्वत्र खळबळ माजते. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. कंगना – अजय यांच्या नात्याची चर्चा अभिनेत्री काजोल हिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

सांगायचं झालं तर, अजय देवगन आणि काजोल यांची ओळख बॉलिवूडच्या पॉवर कपल अशी आहे. पण दोघांच्या नात्याला देखील एस्क्ट्रा अफेअरचा डाग लागला आहे. रिपोर्टनुसार, एक काळ असा होता जेव्हा अजय देवगण आणि कंगना रनौत यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शूटिंगग दरम्यान अजय आणि कंगना यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

अजय आणि कंगना यांच्यामध्ये वाढत असलेली जवळीक काजोल हिला कळल्यानंतर अभिनेत्री भडकली. रिपोर्टनुसार, काजोल हिने अजय याला धमकी देखील होती. ‘मुलांना घेऊन घर सोडून जाईल…’ अशी धमकी अभिनेत्रीने पतीला दिली होती. अशी देखील चर्चा होती की, अजय याच्या दबावामुळे ‘तेज’ आणि ‘रास्कल्स’ सिनेमात कंगना हिला कास्ट करण्यात आलं. तर निर्मात्यांना सिनेमात कंगना हिला कास्ट करायचं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

पण काजोल हिच्यापर्यंत अफेअरच्या चर्चा पोहोचल्यानंतर आणि अभिनेत्रीने दिलेल्या धमकीनंतर अजय याने कंगना हिच्यासोबत असलेलं नातं संपवलं. त्यानंतर कधीच दोघांनी एकत्र काम देखील केलं नाही. पण आजही अनेक वेळी दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगतात.

रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द अजय याने देखील मौन सोडलं होतं. अभिनेता म्हणाला होता, ‘मी असं म्हणत नाही की, एक्स्ट्रा अफेअर नसतात म्हणून… पण कोणाला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चुकीच्या चर्चा रंगतात. कोणाला माझं नाव दुसऱ्या कोणासोबत जोडण्याची परवानगी मी देत नाही. माझं माझ्या कामावप़र प्रेम आहे. माझं काम संपल्यानंतर मी घरी जातो…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.

कंगना रनौत यांचा राजकारणातील प्रवास

कंगना रनौत यांनी खासदार म्हणून राजकारणातील प्रवासाला सुरुवात केली आहे. कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तर निर्माण केलीच आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला आहे.