रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पहायला मिळतेय. तब्बल 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट असलेल्या या चित्रपटात अजय देवगणशिवाय दीपिका पादुकोण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि टायगर श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. इतकंच नव्हे तर सलमान खान या चित्रपटात चुलबुल पांडेच्या अवतारात चाहत्यांना सरप्राइज देणार आहे. ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळालं, ते पाहुयात..
‘सिंघम’ (2011) आणि ‘सिंघम रिटर्न्स’ (2014) नंतर आता या फ्रँचाइजीमधल्या तिसऱ्या भागात अजय देवगण पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याला तब्बल 35 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय.
‘सिंघम’ फ्रँचाइजीमध्ये यंदा पहिल्यांदाच दीपिका पादुकोणची एण्ट्री झाली आहे. यामध्ये ती ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टीची भूमिका साकारतेय. या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिकाने 6 कोटी रुपये फी स्वीकारली आहे.
करीना कपूरने ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये अजय देवगणच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. आता ‘सिंघम अगेन’मध्ये ती अवनी कामथ सिंघमची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करीनाला यासाठी 10 कोटी रुपये फी मिळाली आहे.
सिंघम फ्रँचाइजीमध्ये अक्षय कुमारसुद्धा पहिल्यांदाच झळकणार आहे. या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी त्याला तब्बल 20 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय.
रणवीर सिंहने या चित्रपटातील भूमिकेसाठी 10 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. ‘सिम्बा’मधील त्याच्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं होतं.
‘सिंघम युनिव्हर्स’मध्ये टायगर हा एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने 3 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय.
रोहित शेट्टीच्या या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकी भूमिका साकारणार आहे. अर्जुनने या भूमिकेसाठी सहा कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.
टायगर श्रॉफसोबतच त्याचे वडील जॅकी श्रॉफसुद्धा या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत झळकणार आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी दोन कोटी रुपये मानधन घेतलंय.