मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. मात्र, आकांक्षा पुरीच्या (Akanksha Puri) लिपलॉकमुळे अनेकांनी आता टिका करण्यास सुरूवता केलीये. फक्त आकांक्षा पुरी हिच्यावरच नाही तर शोच्या निर्मात्यांवरही लोक टिका करताना दिसत आहेत. अनेकांनी या वादामध्ये सलमान खान याला देखील आणले आहे. हे लोक बिग बाॅस ओटीटी (Bigg Boss Ott) चर्चेत ठेवण्यासाठी काहीही करू शकतात असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. हा वाद सतत वाढताना दिसत आहे. आकांक्षा पुरी हिने थेट कॅमेऱ्यासमोर 30 सेकंद लिपलॉक केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर चाहते देखील आकांक्षा पुरी हिच्यावर नाराज आहेत. या लिपलॉकचा व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होताना दिसतोय.
आता या प्रकरणात शेवटी आकांक्षा पुरी हिच्याकडून माैन सोडण्यात आलंय. आकांक्षा पुरी हिच्या टिमने यावर जोरदार उत्तर दिल्याचे बघायला मिळत आहेत. आॅफिशियल एक पोस्ट आकांक्षा पुरी हिच्या टिमकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. इतकेच नाही तर आकांक्षा पुरी हिचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
अगोदर तो आकांक्षा पुरी हिचा लिपलॉकचा व्हिडीओ आणि आता तिच्या टिमची पोस्ट पाहून अनेक लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आकांक्षा पुरी हिने मॉडल जद हदीद याच्यासोबत 30 सेकंद लिपलॉक केला आणि त्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. सर्वच स्तरामधून सतत आकांक्षा पुरी हिच्यावर टिका होताना दिसत आहे. शेवटी तिच्या टिमने यावर भाष्य केले आहे.
आकांक्षा पुरी हिच्या टिमकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या लिपलॉकवरून इतका वाद सुरू आहे तो लिपलॉक झाल्यानंतर आकांक्षा पुरी ही थरथर कापत होती. याबद्दल फक्त ती व्यक्ती समजू शकते जिच्यासोबत हे घडले आहे. अभिनेत्री असो किंवा अभिनेते यांच्यासाठी ही अत्यंत साधी बाब असल्याचे तिने अगोदरच सांगितले होते. चित्रपटांसाठी हे करावे लागते.
पुढे आकांक्षाच्या टिमने लिहिले की, हा एक फक्त टास्क होता. मात्र, असे असताना देखील लोक आकांक्षाच्या पाठीमागे बोलत आहेत. एका टास्कसाठी तिने चार कच्चे अंडे खाल्ले मात्र, ते कोणालाच दिसले नाही. हे फक्त एका टास्कसाठी होते आणि आम्हाला आकांक्षा हिच्यावर नक्कीच गर्व आहे. #AkankshaPuri ही क्वीन असल्याचे देखील या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. आता ही पोस्ट व्हायरल होत आहे.