मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत विलासी जीवन जगतात. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांवर, पार्ट्यांवर संपूर्ण जगाची नजर असते. आता अंबानींची सून श्लोक मेहता तिच्या एका हारमुळे चर्चेत आली आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी सून श्लोका मेहताला जगातील सर्वांत महागडा नेकलेस भेट म्हणून दिला आहे. या नेकलेसची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. इतका महागडा दागिना कोणी भेट करू शकेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानीची पत्नी श्लोाक मेहताला जगातील सर्वांत महागडा हार भेट दिला आहे. या नेकलेसची किंमत दोन-चार कोटी नाही तर तब्बल 450 कोटी रुपयांहून अधिक आहे. श्लोका मेहताकडे असलेला हा नेकलेस जगातील सर्वांत महागडा नेकलेस आहे.
तब्बल 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या या नेकलेसमध्ये असं काय खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या नेकलेसमध्ये जगातील सर्वांत मोठा इंटर्नली फ्लॉ लेस हिरा जडलेला आहे. ज्याची किंमत 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. लेबनीज ज्वेलर मौवाड यांनी हा हार बनवला होता. त्याला L’Incomparable असं म्हणतात आणि त्यात जगातील सर्वांत मोठा इंटर्नली फ्लॉ लेस डायमंड लावलेला आहे.
Behold the most expensive necklace ever created ― The L’Incomparable Diamond Necklace, only made possible by Mouawad. #Mouawad #MouawadDiamondHouse #RareJewels #Diamond #GuinnessWorldRecordhttps://t.co/0dlypdX1MH pic.twitter.com/Zf28a5CWa1
— Mouawad (@mouawad) August 2, 2018
श्लोकाच्या या नेकलेसमध्ये 91 हिरे आहेत, जे 200 कॅरेटपेक्षा जास्त आहेत. या हिऱ्यांमुळे नेकलेसला अत्यंत आकर्षक लूक येतोय. विशेष म्हणजे या नेकलेसच्या डिझाइनची कॉपी केली जाऊ शकत नाही किंवा पुन्हा डिझाइनही करता येणार नाही. म्हणजेच अंबानी कुटुंबाची ही अँटिक ज्वेलरी आहे.
अंबानी कुटुंबीय हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. विविध कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये त्यांचे कपडे, घड्याळ, पर्स, दागिने यांच्याकडे आवर्जून लक्ष वेधलं जातं. अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट हिने नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या हातातील अत्यंत छोट्या पर्सची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी होती. तर अनंत अंबानीने 18 कोटी रुपयांचं घड्याळ घातलं होतं.