Akash Shloka Ambani यांच्या चिमुकलीची पहिली झलक; कुटुंबात नव्या पाहुणीचं थाटात स्वागत

| Updated on: Jun 05, 2023 | 4:32 PM

अंबानी कुटुंबातील नव्या पाहुणीची सर्वत्र चर्चा; प्रचंड क्यूट दिसते आकाश - श्लोका अंबानी यांची चिमुकली... कुटुंबात नव्या पाहुणीचं थाटात स्वागत... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Akash Shloka Ambani यांच्या चिमुकलीची पहिली झलक; कुटुंबात नव्या पाहुणीचं थाटात स्वागत
Follow us on

मुंबई | देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. अंबानी कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता पुन्हा अंबानी कुटुंबातील एक आनंदाची गोष्ट चाहत्यांसमोर येत आहे. मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानी यांच्या आयुष्यात गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. सध्या सर्वत्र अंबानी कुटुंबातील नव्या पाहुणीची चर्चा रंगत आहे. शिवाय अनेक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता अंबानी यांनी ३१ मे रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. अंबानी कुटुंबाची लेक शनिवारी रुग्णालयातून तिच्या आजोबांच्या घरी पोहोचली. दरम्यान अंबानी कुटुंबातील चिमुकलीचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अंबानी कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबात आलेल्या नव्या पाहुणीची चर्चा रंगत आहे.

 

 

श्लोका अंबानीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर संपूर्ण कुटुंब आई आणि बाळाला घरी घेवून जाण्यासाठी रुग्णालयात आलं होतं. अंबानी कुटुंबीय रुग्णालयातून निघतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये कारचा मोठा ताफा दिसत होता. ज्यामध्ये आकाश-श्लोका आणि नीता अंबानी बसले होते.

एका कारमध्ये आकाश-श्लोका आणि नीता अंबानी बसले होते. महत्त्वाचं म्हणजे नीता अंबानी यांच्या मांडीवर चिमुकली होती. फोटोग्राफरने व्हिडीओ पोस्ट कर केला आहे. पण चिमुकलीचा चेहरा बदामाच्या इमोजीने लपवला आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षव करत आहेत. सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा आहे.

सांगायचं झालं तर, आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका यांनी ३१ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. पण १० डिसेंबर २०२० रोजी श्लोका आणि आकाश एका गोंडस मुलाचे आई – बाबा झाले. त्यांच्या मुलाचं नाव पृथ्वी अंबानी असं आहे. आता मुलीच्या आगमनाने अंबानी कुटुंब आनंद साजरा करत आहे. शिवाय पृथ्वीला त्याची लहान बहीण भाटली आहे.