Akshay Kumar affair list : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने कायम आपल्या अभिनेयाने आणि थरारक सीनने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ९० च्या दशकापासून खिलाडी कुमार याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वेगवेगळ्या भूमीका साकारत चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अक्षयचं खासगी आयुष्य देखील तुफान चर्चेत राहिलं. अभिनेत्री ट्विकंल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याआधी अक्षय कुमार होता एक दोन नाही तर, चक्क ५ अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला. लग्नाआधीच नाही तर, लग्नानंतर देखील अक्षयचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. आज अशाच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचं नाव अभिनेत्यासोबत जोडण्यात आलं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्टारर ‘धडकन’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी दोघांच्या नात्याला डोक्यावर घेतलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंक पोहचू शकलं नाही. काही काळानंतर अभिनेत्याचं नाव अभिनेत्री ट्विकंल खन्ना हिच्यासोबत जोडण्यात आलं. ज्यामुळे अक्षय आणि शिल्पा यांचं नातं तुटलं. अक्षयने ट्विकंल खन्नासोबत लग्न केल्यानंतर शिल्पाने उद्योजक राज कुंद्रासोबत लग्न केलं.
अभिनेत्री रवीना टंडन
अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या नावाची देखील तुफान चर्चा रंगली. दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा देखील रंगली. अभिनेत्री रेखा यांच्यासोबत नातं जोडल्यानंतर रवीना आणि अक्षय यांच्यामध्या वाद सुरु झाले. महत्त्वाचं म्हणजे दोघांनी मंदिरात 2 वेळा साखरपुडा देखील केला. पण दोघेही कधी एकत्र येवू शकले नाहीत.
अभिनेत्री रेखा
रेखा आणि अक्षय यांच्या नात्याबद्दल देखील तुफान चर्चा रंगल्या. जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती झालं तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला. ‘खिलाडियो के खिलाडी’ सिनेमानंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. मिळालेल्या माहितीनुसार रेखा, अक्षयसाठी जेवणाचा डब्बा देखील घेवून यायच्या. (Akshay Kumar affair list)
अभिनेत्री प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार यांना अनेक सिनेमांमध्ये काम केलं. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्यानंतर ट्विंकलने अक्षयला प्रियंकासोबत काम करण्यास मनाई केल्याचं समोर आलं.
अभिनेत्री कतरिना कैफ
अक्षय कुमारचं नाही तर, अभिनेता रणबीर कपूर आणि सलमान खान याच्यासोबत देखील कतरिना हिचं नाव जोडण्यात आलं. पण कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्री विक्की कौशल याच्यासोबत लग्न केलं. अक्षय आणि कतरिना यांनी ‘सिंह इज किंग’, ‘वेलकम’, ‘नमस्ते लंडन’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. ज्यानंतर त्यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.