मुंबई : इंडियन सिनेविश्वात अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्या प्रचंड सुंदर आहेत… इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्री फक्त त्यांच्या अभिनयामुळे नाही तर, सौंदर्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. अशा अभिनेत्रींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्रींचे लहानपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता देखील फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या अभिनेत्रीचा शाळेतील फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखणं देखील फार कठीण आहे… गणवेश, कपाळावर टिकली आणि शिक्षकांच्या बाजूला बसलेली चिमुकली आज लोकप्रिय अभिनेत्री आहे.
फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी संख्या आहे. अभिनेता सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत देखील फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीने स्क्रिन शेअर केली आहे. एका सिनेमात तर अभिनेत्रीचं हृदयद्रावक निधन देखील झालं. फोटोमध्ये गणवेशात दिसणारी चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री असिन थोट्टूमकल आहे. फोटोमध्ये असिन प्रचंड क्यूट दिसत आहे..
असिन थोट्टूमकल हिने तिच्या करियरची सुरुवात इंडियन सिनेमातून केली. असिन हिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. असिनने 2001 मध्ये नरेंद्र माकन जयकांथन वाका सोबत सहाय्यक अभिनेत्री म्हणून वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
असिन हिने तामिळे सिनेविश्वात देखील काम केलं आहे. त्यानंतर असिन हिने बॉलिवूडमध्य पदार्पण केलं.. असिन हिने गजनी, रेडी, बोल बच्चन आणि ऑल इज वेल सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले. फार कमी काळात असिने हिला प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतलं. असिन हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात.
पण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे. असिन हिने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केलं आणि तेव्हापासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला. असिन झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर आजही तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
असिन आता झगमगत्या विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आजही सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.