मुंबई : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार नुकताच अक्षय कुमार त्याच्या पुढच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडला पोहोचला होता. उत्तराखंडला पोहोचल्यानंतर अभिनेत्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. काही दिवसांपूर्वी, अभिनेता केदारनाथ धामला गेला होता आणि नंतर खिलाडी कुमार बद्रीनाथ धाम आणि जागेश्वर धाम याठिकाणी देखील दर्शनासाठी गेला होता. अक्षय कुमारने त्याच्या खास प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र अक्षय कुमार याच्या फोटोंची चर्चा आहे. दरम्यानस पापाराझींनी नुकताच अभिनेत्याला मुंबई विमानतळावर स्पॉट केलं. पण यावेळी अक्षय त्याच्या लूकमुळे नाही तर, एलईडी बॅगमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र खिलाडी कुमार याची चर्चा आहे.
अक्षय कुमार मुंबई विमानतळावर काळ्या रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेत्याने काळ्या रंगाचा गडद चष्मा घातला होता. पापाराझींना पाहिल्यानंतर अभिनेत्याने फोटो आणि व्हिडीओसाठी पोड दिल्या. पण अक्षय कुमार याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या एलईडी बॅगने चाहत्यांच्या नजरा वेधल्या. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या बॅगची चर्चा आहे.
अक्षय याच्याकडे असलेली बॅग प्रचंड महागडी आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याकडे असलेली बॅगची किंमत जवळपास ३५ हजार रुपये असल्याची सांगण्यात येत आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अक्षय कुमार खूपच मस्त दिसत होता आणि पूर्ण स्टाईलमध्ये त्याची बॅग फ्लॉंट करताना दिसला.
अभिनेत्याच्या बॅगमध्ये एलईडी डिस्प्ले आहे. अक्षय याच्या महागड्या बॅगची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे असलेल्या बॅगची किंमत ९ हजार रुपयांपासून सुरु होते. ३५ हजार रुपयांपर्यंत ही बॅग तुम्ही देखील खरेदी करु शकता.. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
नेटकरी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘मार्केटमध्ये ही बॅग २ हजार रुपयांमध्ये मिळते.’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ती बॅग नाही त्यामध्ये राज कुंद्रा बसला आहे मास्क लावून…’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘एवढा तर माझा बँक बॅलेन्स पण नाही…’ सध्या सर्वत्र अक्षय कुमार आणि त्याच्या बॅगची चर्चा रंगत आहे.