Akshay Kumar | वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार याने स्वत:ला आणि चाहत्यांना दिले अत्यंत मोठे गिफ्ट, अभिनेत्याने थेट

| Updated on: Sep 09, 2023 | 4:55 PM

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंवर अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Akshay Kumar | वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार याने स्वत:ला आणि चाहत्यांना दिले अत्यंत मोठे गिफ्ट, अभिनेत्याने थेट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आज 56 वा वाढदिवस आहे. अक्षय कुमार याचे चाहते हे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा हे मोठ्या प्रमाणात देताना दिसत आहेत. कोरोनानंतर अक्षय कुमार याचे चित्रपट काही विशेष धमाका करू शकत नाहीयेत. अक्षय कुमार याचे चित्रपट (Movie) एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, याही चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. मात्र, असे असतानाही हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, यावेळी तो चाहत्यांसाठी काहीतरी वेगळे घेऊन येणार आहे. अक्षय कुमार याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत.

अक्षय कुमार याचा आज 56 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी अक्षय कुमार याने त्याच्या चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट हे दिले आहे. यामुळे आता अक्षय कुमार याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. अक्षय कुमार याने वेलकम टू द जंगल (वेलकम 3) चा टीझर नुकताच रिलीज केलाय. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर केलीये.

अक्षय कुमार याने टीझरचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज मी स्वत: ला आणि तुम्हाला हे मोठे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना वेलकम 3 चा हा टीझर जबरदस्त आवडल्याचे देखील दिसत आहे. हा टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होत आहे. चाहते या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. या चित्रपटामध्ये मोठी स्टार कास्ट दिसत आहे.

अक्षय कुमार, दिशा पटानी, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, सुनील शेट्टी, संजय दत्त, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, रवीना टंडन, किकू शारदा, अर्शद वारसी, तुषार कपूर, लारा दत्ता, मुकेश तिवारी, शारीब हाशिम, श्रेयस तळपदे, राहुल देव, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा हे सर्व या टीझरमध्ये दिसत आहेत. वेलकम 3 हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.