मुंबई : अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही जोडी 90 च्या दशकात खूप गाजली होती. चित्रपटांमध्ये ही जोडी हिट ठरत होती. लोकांकडून या जोडीला खूप प्रेम मिळत होतं. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी 1994 मध्ये ‘मोहरा’ सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. हा चित्रपट खूप गाजला. 3 कोटी 75 लाखात तयार झालेल्या या सिनेमाने 22 कोटींहून अधिकची कमाई केली. या चित्रपटातून या दोघांची जोडी सुपरहिट ठरली.
मोहरा नंतर रिलीज झालेल्या ‘मैं खिलाडी तू अनारी चित्रपट देखील हिट ठरल. एकाच वर्षात सलग दोन हिट चित्रपट दिल्यानंतर ही जोडी चर्चेत राहिली. पण खऱ्या आयुष्यात ही ते एकमेकांच्या जवळ आले होते. बराच काळ ते रिलेशनशिपमध्ये राहिले. अक्षय कुमार आणि रवीना टंडन लग्न ही करणार होते. पण नंतर दोघांमध्ये काय झाले कोणालाच कळाले नाही. त्यांनी हे नातं मध्येच तोडलं. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी एंगेजमेंट झाल्याचं मान्य देखील केलं होतं.
एंगेजमेंट तुटल्यानंतर अक्षय कुमार हा शिल्पा शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा होती. यानंतर रवीना टंडनला खूप वाईट वाटले होते. रवीना टंडनने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते, ‘हा सर्वसंमतीने घेतलेला निर्णय होता. माझं लग्न निश्चितच झालं होतं, पण लग्न झाले नाही. मला साधं आयुष्य हवं होतं, मी लग्नासाठी अभिनय सोडण्याचा निर्णयही घेतला होता. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी लग्न करायचं ठरवलं होतं. पण नंतर परिस्थिती बदलली.
एंगेजमेंट तुटल्यानंतरही रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी 5 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अक्षय कुमारने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते, ‘माझी आणि रवीनाची एंगेजमेंट झाली होती. पण आम्ही लग्नापर्यंत पोहोचू शकलो नाही. आमच्या ब्रेकअपनंतरही आम्ही मित्रच राहिलो आणि नंतरही शूटिंग सुरूच ठेवले.
शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी 2004 मध्ये शेवटचा एकत्र सिनेमा केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता 19 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
अक्षय आणि रवीना आता ‘वेलकम-3’मध्ये एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 19 वर्षांनंतर 90 च्या दशकातील ही जोडी प्रेक्षकांना कॉमेडीचा टच देताना दिसणार आहे.