Akshay Kumar On Women Safety : २०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण पसरलं होतं. आजही घटनेच्या आठवणी ताज्या झाल्यानंतर एकच खळबळ माजते. ‘निर्भया’ या धक्कादायक प्रकरणानंतर अभिनेता अक्षय कुमारने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नुकताच झालेल्या ‘कोन बनेगा करोडपती १४’ शोमध्ये अक्षय कुमारने मोठा खुलासा केला आहे. निर्भया प्रकरणानंतर अक्षयने महिलांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच काम हाती घेतलं आहे.
अक्षय कुमार ‘कोन बनेगा करोडपती १४’ शोच्या फिनालेमध्ये पोहोचला होता. प्रत्येकाला माहित आहे की, अक्षय कुमार फक्त एक उत्तम अभिनेता नसून मार्शल आर्टिस्ट देखील आहे. वयाच्या ९ व्या वर्षी अभिनेत्याने मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अक्षयने तायक्वांडो, कराटे आणि मय थाईमध्ये विषेश प्रशिक्षण घेतलं आहे.
मार्शल आर्टच्या बळावर अभिनेत्याने महिलांना स्वतःचं रक्षण कण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. ‘केबीसी’ मध्ये अभिनेता म्हणाला, ‘२०१२ मध्ये निर्भया प्रकरणानंतर मी २०१३ पासून महिलानी सेल्फ डिफेंसचे धडे देण्यासाठी सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात जे काही करु शकलो आहे, त्याचं श्रेय अभिनयाला नाही, तर मार्शल आर्टला देईल.’
अभिनेता पुढे म्हणाला, ‘मार्शल आर्ट माझ्यासाठी सर्वकाही असल्यामुळे मी भारतात अनेक ठिकाणी सेल्फ डिफेंसचे क्लास सुरू केले आहेत.’ आतापर्यंत अक्षयने जवळपास ९० हजार महिलांना सेल्फ डिफेंसचं प्रशिक्षण दिलं आहे. अक्षयच्या या निर्णयामुळे अभिनेत्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
‘या मोहिमे अंतर्गत मी आतापर्यंत ९० हजार महिलांना प्रशिक्षण दिलं आहे. या कामाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत.’ असं देखील अभिनेता म्हणाला. एवढंच नाही, तर अभिनेत्याने थायलँडमध्ये देखील अनेकांना मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण दिलं आहे. सांगायचं झालं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षय मार्शल आर्ट शिक्षण होता.