ट्विंकल खन्ना पब्लिक टॉयलेटमध्ये अडकली आणि… चाहत्याने विचारला हा प्रश्न

| Updated on: Jul 09, 2024 | 7:43 PM

अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही चित्रपटांपासून दूर आहे. ट्विंकल खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्नाने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर नुकताच एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ट्विंकल खन्ना पब्लिक टॉयलेटमध्ये अडकली आणि... चाहत्याने विचारला हा प्रश्न
Twinkle Khanna
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायमच चर्चेत असते. ट्विंकल खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ट्विंकल खन्ना दिसते. ट्विंकल खन्ना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. ट्विंकल खन्ना हिने नुकताच एक मोठा खुलासा केलाय.

ट्विंकल खन्ना ही नुकताच बहीण रिंकी खन्ना हिच्यासोबत धमाल करताना दिसली. दोघी बहिणी जयपूरला फिरण्यासाठी गेल्या. यावेळीचाच खास एक व्हिडीओ ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओवरून हे दिसत आहे की, दोघी बहिणींनी खूप चांगला वेळ एकत्र घालवला आहे. यासोबतच हा व्हिडीओ पोस्ट करत ट्विंकल खन्ना हिने मोठी माहितीही शेअर केलीये. 

ट्विंकल खन्ना आणि तिची बहीण चक्क पब्लिक टॉयलेटमध्ये अडकल्या. मात्र, याबद्दल अधिक काही खुलासा ट्विंकल खन्ना हिने केला नाहीये. ट्विंकल खन्नाने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आम्ही एकाच पंखाचे पक्षी आहोत. आमचे जेली शूज चुकवू नका. मोठं होण्याच्या जबाबदाऱ्या विसरून जा, तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, ज्याला तुमचे सर्व जोक कळतात.  

हेच नाहीतर तो व्यक्ती तुम्हाला पोटभरून हसू देखील शकतो. मी शनिवार व रविवार @theoberorajvilas येथे माझ्या बहिणीसोबत खास वेळ घालवला. आम्ही गट्टयाची भाजी खाल्ली. @thepdkfstore वर थेरपीसाठी गेलो आणि त्याशिवाय आम्हाला पब्लिक टॉयलेटमध्ये बंद करण्यात आले… आता ट्विंकल खन्ना हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

लोक ट्विंकल खन्ना हिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, खरोखरच बहिणीसोबत असा खास वेळ घालवायला हवा. दुसऱ्याने म्हटले की, अक्षय कुमार कुठे आहे?  ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केल्यापासून ती फार काही चित्रपटांमध्ये दिसली नाही. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी विदेशात शिक्षण घेताना ट्विंकल खन्ना ही दिसली होती.