Alia Bhatt : दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शिक ‘स्टूडन्ट ऑफ द ईअर’ सिनेमातून अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आलियाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक सिनेमात आलिया दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली. करणची स्टूडन्ट ते माफिया क्विन गंगुबाई काठिवाडी पर्यंतचा आलियाचा प्रवास चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल. ज्याप्रमाणे आलिया मोठ्या पडद्यावर राज्य करते, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील आलियाच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. इन्स्टाग्राम पोस्ट करत आलिया कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील आलियाने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आलियाचा नवा लूक चाहत्यांना आवडला, पण एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल केलं आहे. (alia bhatt life style)
नुकताच आलिया हिला ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यात आलियाने डीपनेक आणि हाय स्लिट गाऊल घातला होता. ग्लॅमरस ड्रेसमध्ये आलिया फार सुंदर दिसत होती. नव्या लूकमध्ये आलियाने मध्यरात्री दोन वाजता फोटो इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (alia bhatt social media)
आलियाच्या फोटोवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘रात्री २ वाजले आहेत दीदी झोप आता…’, तर दुसरा नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर, ‘झोपून जा ताई..’ असं म्हणाला आहे. तर काही चाहते आणि सेलिब्रिटींनी आलियाच्या नव्या लूकचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र आलियाच्या पोस्टची चर्चा आहे. आलियाच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. (alia bhatt new post)
आलिया भट्ट कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आलिया तिच्या आयुष्यातील कोणतीही महत्त्वाची गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना कळवत असते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलीला जन्म दिला आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आता अभिनेत्री ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात आलिया हिच्या सोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवया आलियाचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘हार्ट ऑफ स्टोन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Alia bhatt film)