दिग्गज फिल्ममेकर महेश भट्ट यांची हार्ट सर्जरी ; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

| Updated on: Jan 20, 2023 | 10:07 AM

भट्ट कुटुंबासाठी एक वाईट बातमी... अभिनेत्री आलिया भट्ट हिचे वडील आणि दिग्गज फिल्ममेकर महेश भट्ट यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर; नुकताच झाली हार्ट सर्जरी

दिग्गज फिल्ममेकर महेश भट्ट यांची हार्ट सर्जरी ; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
दिग्गज फिल्ममेकर महेश भट्ट यांची हार्ट सर्जरी ; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us on

Mahesh Bhatt Heart Surgery : अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या कुटुंबासाठी एक वाईट बातमी आहे. नुकताच आलिया भट्ट हिचे वडील महेश भट्ट यांची हार्ट सर्जरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश भट्ट यांची एंजियोप्लास्टी झाली आहे. गेल्या महिन्यात महेश भट्ट हार्ट चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी महेश भट्ट यांना लवकरात लवकर हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हार्ट सर्जरी केली आहे.

महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट याने वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. महेश भट्ट यांना आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हार्ट सर्जरी करण्यात आली. आता महेश भट्ट यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती राहुल भट्ट याने दिली आहे.

 

 

महेश भट्ट यांच्या प्रकृतीबद्दल माहिती चाहत्यांना मिळाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. सध्या चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. सध्या महेश भट्ट त्यांच्या हार्ट सर्जरीमुळे चर्चेत आले आहेत. महेश भट्ट हे ७४ वर्षांचे आहेत.

अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे महेश भट्ट. बॉलिवूडमध्ये बोल्ड सिनेमांची सुरुवात महेश भट्ट यांनी केली. महेश भट्ट यांनी ‘राज’, ‘जिस्म’, ‘पाप’, ‘मर्डर’, ‘रोग’, ‘जहर’, ‘मर्डर 2’, ‘जिस्म 2’ यांसारख्या बोल्ड सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान, कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना महेश भट्ट यांच्या हार्ट सर्जरी मुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश भट्ट घरी विश्रांती घेत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीच्या जन्मनंतर दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

राहा कपूर हिच्या जन्मानंतर महेश भट्ट यांनी देखील आनंद व्यक्त केला होता. आलिया हिने ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया हिने लेकीच्या जन्माची घोषणा सोशल मीडियाच्यामाध्यमातून केली. पण अद्याप आलियाने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आलिया आणि रणबीर यांनी लेकीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.