Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर ही फिटनेस तिने कायम ठेवला आहे. सध्या ती मेट गाला 2024 च्या लूकमुळे चर्चेत आहे. आलियाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नजर लागू नये म्हणून अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. यामागे आलिया भट्ट देखील मागे नाही. तिने देखील नजर लागू नये म्हणून एक उपाय केला आहे. तिचा एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने कानामागे काळा टिक्का लावला आहे.
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट एक आहे. त्यामुळे तिचा लूक नेहमीच चर्चेत असतो. आलिया भट्टचा मेट गाला लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने 6 मे रोजी ‘मेट गाला 2024’ या मेगा फॅशन इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. सलग दुसऱ्या वर्षी आलियाने यामध्ये भाग घेत फॅशन कौशल्य दाखवले आहे. आलियाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदा आलिया पारंपरिक लूकमध्ये दिसली.
मेट गालाच्या कार्पेटवर आलियाने डिझायनर सब्यसाचीच्या आउटफिटमध्ये एन्ट्री केली. अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंटेड साडी घातली होती, ज्यामध्ये ती राजकुमारी सारखीच दिसत होती. आलियाने नजर लागू नये म्हणून एक देसी युक्तीही केली होती. तिच्या हा लूक पाहिल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स आणि चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.
मेट गाला कार्पेटवर आलिया भट्ट एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे तिला नजर लागू नये म्हणून तिने कानाच्या मागे काळा टिक्का देखील लावला होता. तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आलिया भट्टची ही सुंदर साडी बनवण्यासाठी डिझायनर सब्यसाचीला 2 महिन्यांहून अधिक काळ लागला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने वोगशी बोलताना केलाय. आलियाने सांगितले की, तिची साडी 1965 तासांत तयार झाली. इतकंच नाही तर 163 कारागिरांच्या मेहनतीने ती बनवण्यात आली आहे.
आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती करण जोहरच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशल आणि रणबीर कपूर दिसणार आहेत.