Alia Bhatt | आलिया भट्ट हिने केला रणबीर कपूर याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, अजूनही त्याने

| Updated on: Jul 22, 2023 | 2:24 PM

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आता लवकरच आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया भट्ट ही दिसत आहे. नुकताच आलिया हिने मोठा खुलासा केला आहे.

Alia Bhatt | आलिया भट्ट हिने केला रणबीर कपूर याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, अजूनही त्याने
Follow us on

मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) ही व्यस्त आहे. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दिसत आहेत. राहा हिला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच या चित्रपटातील (Movie) गाण्याचे शूटिंग आलिया भट्ट हिने थेट कश्मीर येथे केले. इतकेच नाही तर यादरम्यान आलिया भट्ट ही राहा हिला देखील घेऊन गेली होती. या गाण्याच्या शूटिंगची काही किस्से सांगताना करण जोहर हा दिसला होता. इतकेच नाही तर रणबीर कपूर यानेही आलिया आणि राहा कश्मीरला गेल्याचे सांगितले होते.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता आलिया भट्ट ही चर्चेत आलीये. आलिया भट्ट हिने या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे केले आहेत. आलिया भट्ट म्हणाली की, नेहमीच रणबीर कपूर हा माझ्या कामामध्ये माझी मदत करतो. इतकेच नाही तर राॅकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या म्यूझिकमध्येही त्याने खूप जास्त मदत केली.

यासोबतच आलिया भट्ट हिने मोठा खुलासा करत सांगितले की, रणबीर कपूर याने तिचा अजून रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट बघितला नाहीये. रणबीर कपूर कामामध्ये व्यस्त असल्याने त्याला रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट बघण्यास अजिबातच वेळ मिळाला नसल्याचे सांगताना देखील आलिया भट्ट ही दिसत आहे.

पुढे आलिया भट्ट म्हणाली की, परंतू आता रणबीर कपूर हा पुढच्या आठवड्यामध्ये रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट नक्कीच बघणार आहे. त्याच्याकडे वेळ नसला तरीही मी तो वेळ नक्कीच काढेल. तसेच या मुलाखतीमध्ये आलिया भट्ट ही रणबीर कपूर याच्याबद्दल बोलताना देखील दिसली आहे. नेहमीच आपल्याला रणबीर मदत करतो हे देखील आलिया हिने सांगितले.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच नाहीत. इतकेच नाही तर हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंह काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.