मुंबई : आलिया भट्ट हिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट (Movie) नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाने मोठा धमाका केला. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्यासोबत रणवीर सिंह हा दिसला. विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या जोडीने धमाका केला. आलिया भट्ट हिने मुलगी राहा हिच्या जन्मानंतर रॉकी और रानी की प्रेम (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) कहानी चित्रपटातील एक गाणे काश्मीर येथे शूट केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटापासून आलिया भट्ट ही सतत चर्चेत आहे. नुकताच आलिया भट्ट हिने एक मोठा खुलासा केलाय. यावेळी आलिया भट्ट ही शाहरुख खान याच्याबद्दल बोलताना दिसली. फक्त शाहरुख खान हाच नाही तर संजय लीला भन्साळी आणि करण जोहर यांच्याबद्दल मोठा खुलासा तिने केलाय.
आलिया भट्ट ही म्हणाली की, शाहरुख खान याच्यासोबत डियर जिंदगी चित्रपटात काम करण्याचा माझा जबरदस्त असा अनुभव नक्कीच राहिला. मी शाहरुख खान याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले. सेटवर शाहरुख खान याचा एक वेगळा आणि खास व्यवहार हा सर्वांसोबतच असतो. तो प्रत्येक व्यक्तीला सन्मान देतो.
पुढे आलिया भट्ट ही म्हणाली, संजय लीला भन्साळी यांच्यासोबत मी काम केले. मी ज्यावेळी संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर जाते त्यावेळी मला शाळेत आल्यासारखे वाटते. प्रत्येक गोष्ट त्यांच्या सेटवर शिकायला मिळते. ते अत्यंत जिद्दी आहेत. मी संजय लीला भन्साळी यांच्याकडून कल्पना करायला शिकले. कॅमेऱ्यासमोर आपण काय करायला हवे आणि काय नाही ते देखील शिकले.
पुढे करण जोहर याच्याबद्दल बोलताना आलिया भट्ट ही म्हणाली की, करण जोहर याच्याकडूनही मी बऱ्याच गोष्टी या शिकले आहे. चातुर्य, इतरांचा आदर आणि शिष्टाचार या महत्वाच्या तीन गोष्टी करण जोहर याच्याकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगताना आलिया भट्ट ही दिसली. आलिया भट्ट हिचा एक खास व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. यावेळी आलिया हिच्यासोबत तिची मुलगी राहा देखील दिसली.