दिवाळी पार्टीत आलियाच्या आउटफिटची चर्चा; घातला 2 वर्ष जूना सोन्या-चांदीने जडलेला लेहंगा
मंगळवारी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी आले होते. मात्र आलिया भट्टच्या एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत आलियाने 2 वर्ष जुना सोन्या-चांदीने जडलेला लेहंगा घातला होता.
1 / 9
मंगळवारी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी आले होते. पार्टीमध्ये आलेल्या सेलिब्रिटींच्या आउटफिटची चर्चा तेवढीच असते
2 / 9
मात्र यावेळी आलिया भट्टच्या एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत आलियाने 2 वर्ष जुना सोन्या-चांदीने जडलेला लेहंगा घातला होता. तिने राणीच्या गुलाबी लेहेंग्यात धमाकेदार एंट्री केली. हा लेहेंगा मनीषसाठी खास आणि अनोखं सरप्राईज होतं.
3 / 9
आलियाने तिच्या मेहंदी समारंभात पहिल्यांदा हा पोशाख परिधान केला होता.
4 / 9
हा लेहंगा मनीष मल्होत्राने आलियासाठीच डिझाइन केला होता. यात काश्मिरी आणि चिकनकारी धाग्याचे काम आहे, जे बनवण्यासाठी सुमारे 3000 तास लागले होते.
5 / 9
हा लेहंगा काश्मिरी आणि चिकनधारी धाग्याने विणलेले आहे. मिजवान वेलफेअर सोसायटीच्या महिलांनी त्यावर नक्षीकाम केले आहे. यात बनारसी ब्रोकेड, जॅकवर्ड, बांधणी आणि रॉ-सिल्क नॉट्सचा समावेश आहे. तसेच या लेहंग्याच्या ब्लाऊजवर सोन्या-चांदीची जरी आहे. तसेच या आऊट-फिमध्ये 180 पॅच लावण्यात आले आहेत.
6 / 9
'सस्टेनेबल फॅशन'वर भर देत आलियाने या दिवाळी पार्टीत पुन्हा एकदा तिच्या आउटफिटची पुनरावृत्ती केल्याचे पाहायला मिळाले.
7 / 9
नॅशनल अवॉर्ड्समध्ये आलियाने तिच्या लग्नाची साडी परिधान केली होती त्याच प्रमाणे आता पुन्हा एकदा हा मेहंदीवाला लेहंगा परिधान केला होता.
8 / 9
आलिया एकदा मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत देखील तिचा मेहंदीचा पोशाख परिधान करताना दिसली. यावेळी आलियाने हा तोच लेहंगा वेगळ्या स्टाईलने परिधान करून आणि त्याला साजेसे असे दागिनेही घातलेले पाहायला मिळाले.
9 / 9
Alia Bhatt repeats Her Outfit For Manish Malhotra Diwali Party